Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण!

शनिवार दिनांक १६ मे रोजी लॉस अँजेलिस सकाळी ८:०० ते ११:४५ वा. आणि भारतातून रात्रौ ९: ०० वाजता थेट प्रेक्षपण.

लॉस अँजेलिस -(१५ -०५-२०); हॉलिवूड, बॉलिवूड तसेच मराठी कलाक्षेत्रातील हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे गेल्या शनिवारी दिनांक ९ मे २०२० रोजी सायंकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार दिनांक १० मे २०२० रोजी सकाळी ७:३० वाजता) अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथील इस्पितळात ‘ग्लायोब्लास्टोमा’ या ब्रेन कॅन्सरने निधन झाले होते. सध्या अमेरिकेतील कोरोना मृत्यू व लॉकडाऊनमुळे साईचे अंत्यसंस्कार लांबणीवर ठेवावे लागले. एका आठवड्यानंतर अमेरिका प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर शनिवार दिनांक १६ मे २०२० रोजी लॉस अँजेलिस येथे सकाळी ८:०० ते ११:४५ वा. या दरम्यान होणार आहेत. भारतातून १६ मे २०२० रोजी रात्रौ ९: ०० वाजता थेट प्रेक्षपण पाहता येईल. हे अंत्यसंस्कार प्रत्यक्ष पाहण्यासाठी https://oneroomstreaming.com/ वेबसाईवर जाऊन [email protected] हा ईमेल आणि ZHPNDX या पासवर्डचा वापर करावा लागणार आहे.

Sai Gundewar

साई गुंडेवार यांनी एम टीव्हीच्या स्प्लिट्स व्हिला पर्व चार, स्टार प्लसवरील सर्व्हायवर तसेच अमेरिकेतील लोकप्रिय एस.डब्ल्यू.ए.टी. , कॅग्नी अँड लॅसी, द ऑरव्हिले, मार्स कॉस्पिरसी, द कार्ड मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्याने ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये आणि विविध जाहिरातपटांमध्ये त्याने भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम‘ या एकमेव मराठी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी फॅशन डिझायनर सपना अमीन, आई शुभांगी व राजश्री, वडील राजीव गुंडेवार असा परिवार आहे. या आवडत्या अभिनेत्याच्या तरुण वयात कर्क रोगामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

The post अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण! appeared first on MarathiStars.

Share the post

अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण!

×

Subscribe to Marathistars.com | Marathi Movies | Reviews | Tv Serials | Actress | Actors | Trailer | Celebrities

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×