एक कप साबुदाणा घेऊन तो पाण्यात 2-3 दा धुवून घ्यावा. सगळा स्टार्च निघू पाणी स्वच्छ व्हायला हवं. मग बाऊलमधे साबुदाणा आणि अर्धा कप दूध भिजत ठेवावं रात्रभर. सकाळी उठल्यावर आधी साबुदाणा हाताने मोकळा करून घ्यावा. एक उकडलेला बटाटा मध्यम फोडी करून घ्या. दोन मिरच्या बारीक चिरा. पाव कप भाजलेल्या दाण्याचे कुट करून घ्या. आता साबुदाण्यात कुट, मिरची, चवी पुरते मीठ, पाव चमचा साखर घालून