Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

हिशोब😂

सदाशिव पेठेत उभा राहून नागपुरी व्यक्ती एका पुणेरी व्यक्तीला विचारतो…..
.
नागपुरी व्यक्ती :- ओ भाऊ, हयोच का हो तो शनिवार वाडा बाजीराव मस्तानीचा…??
.
पुणेरी व्यक्ती :- (आपल्या नेहमीच्या पुणेरी अंदाजात)
.
इतिहास दफ्तरी नोंद असल्याप्रमाणे मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीराव प्रथम द्वारा १० जानेवारी १७३० रोजी पायाभरणी तसेच २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तुशांत केलेली इमारत म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात “शनिवार वाडा” ती हिच….!!
.
भाषेवरून विदर्भातले वाटतात, गाव कोणते तुमचे..???
.
नागपुरी व्यक्ती :- जशास तसे या मुद्रेत येऊन…..
.
भारतीय उपखंडातील २१’८ उत्तर अक्षांश व ७९’५ पूर्व रेखांश मध्ये येणारे, मध्य भारतात ० मैल स्तंभ असलेले देशाचे केंद्रबिंदू, सिट्रस सिनेन्सिस या लिंबु वर्गीय आंबट मधुर चवयुक्त फळाचे उत्पत्ति स्थान,
नाग नदीच्या काठी वसलेले, पुरातन कालीन संबोधले जाणारे दुहेरी अवतरण चिन्हात “फनिन्द्रपुर” वा “नारंगपुर” येथील मी रहिवाशी…!!
पुणेरी व्यक्ती :- अहो म्हणजे काय..??
.
नागपुरी व्यक्ती :- भाऊ, नागपुरचा हायनं मी….!!
.
पुणेरी व्यक्ती :- अहो मग सरळ सोप्या भाषेत सांगायचे कि…
.
नागपुरी व्यक्ती :- भाऊ, तुम्ही मले इतिहास शिकवला, म्या तुम्हाले भुगोल शिकवला,
हिसोब,,,बराबर



This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

हिशोब😂

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×