Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

लॉकडाऊन मधली घरं.

आजी सारखी काय ग त्या गॅलरीत जाऊन बस्तीयेस. बघ ना मराठी पिक्चर लागलाय मुंबईचा फौजदार. आजी म्हणाली दिसतो मला इथून. माझी आवडती जागा आहे ही आणि हो, मला दोन्ही साधतं ग, टीव्ही दिसतो आणि हा बाहेरचा पिक्चर पण. लग्नाच्या वयाची नात तिला गम्मत वाटली. नाही तरी tv बघून पण बोर झालं होतं. बाहेरचा काय पिक्चर आहे बाई? त्यावर आजी म्हणाली, “अग तुम्ही सगळे जॉब, कॉलेजला गेले कि मला हेच काम असत इथे बसुन, कोणाचं काय सुरू आहे ते. रिकाम्या चौकश्या म्हण हवं तर. आजी हसत म्हणाली.”

अग पण लॉक डाऊन मुळे बाहेर कोणी नाही काय कळणार नाही आणि कोणी बोलायला माणुस दिसणार नाही ए तुला. आजी म्हणाली, “आता माणसं बोलत नाहीचए माझ्याशी आता खिडक्या आणि गॅलरीतून दिसणारी घरं बोलत आहेत माझ्याशी.” नातीला इंटरेस्ट वाटला. ती येऊन बसली आजीजवळ. मलाही सांग काय बोलत आहेत घरं. ऐक ते कोपऱ्यात असलेलं घर. ती प्रेग्नन्ट होती बघ, माहेरी जाणार होती डिलिव्हरी झाल्यावर. सासू आणि ती मिनिट पटत नव्हतं. तीच म्हणणं होतं जरा खेडवळ आहेत सासूबाई माझ्या बाळाला नीट सांभाळायच्या नाही. पण लॉक डाऊन मध्येच डिलिव्हरी झालेली दिसते आणि त्या बघ सासुबाई किती स्वच्छ डेटॉलच्या पाण्यात दुपटी पिळून वाळत घालत आहे. सकाळी ओव्या धुरीचा वास येत होता. चांगल्या तुपाचा कणकीचा शिरा तिथेच भाजल्याचा वास होता तो, बघ कसंही असलं तरी आपलं माणूसच कामी आलं ना, असा संदेश देते बघ ती गॅलरी.
नातीला आजीच्या अश्या अँगल ने विचार करणं गमतीच वाटलं. आजी आणखी सांग ना पुढच घर. आजी म्हणाली मजा वाटते ना ऐकायला. मला पण असे घर निरीक्षण करायला कधी मजा वाटते, कधी दुःख, कधी धडाही मिळतो वेगवेगळे अनुभव. आपण आयुष्यात कस वागू नाही असाही संदेश देतात अग काही लोक.

ती वरची गॅलरी बघ अगदी सधन आहेत दोघेही नोकरीत एक लेकरू. सगळ्या कामाला बाई, पण आता सगळी काम करावी लागतात. पण असं कधी होत नाही की सतत ती बाईच कपडे वाळत घालेल कधी तो नवरा, कधी लेकरू असे सगळे मिळून काम करतात, समानतेची बीज चांगली रोवलेली दिसतात. तेच त्याच्या पलीकडे बघ ती बाई केवढी बादली घेऊन कपडे वाळत टाकते. ती अजुन जेवली पण नसेल. नात हसून म्हणाली कश्यावरून ग. आजी म्हणे ऐक. आजीने त्या बाईला हाक मारली, “काय झालं का जेवण? “तेंव्हा ती बाई म्हणे, “नाहीओ अजून ओटा लख्ख करायचा आणि मगच बसायचं बाकीच्यांची झाली.” आजी नातीला म्हणाली, “आता तुला वाटेल घरातल्यानी मदत करावी ना हिला. पण ही बयाच नाठाळ आहे. रोज भाजीला जाताना बोलते रस्त्यावरून एकदा मी म्हंटल कशाला तुम्ही जाता भाजीला?नवऱ्याला, पोरीला सांगायचं ना येताना घेऊन या म्हणून. त्यावर म्हंटली होती, “मला नाही बाई कोणाच्या हातच पटत, सगळं मला मीच केलेलं आवडतं!” हेकट आहे ती, म्हणून तर आपला चारचा चहा आणि तिचं जेवण एक वेळ. बघ सगळ्यात जास्त ओले कपडे तेच सांगत आहेत तिच्या घराविषयी. किती उशीर झाला तरी करणार मीच आणि मग सगळं घर परावलंबी करून ठेवायच मी पणा करू नाही हेच शिकवलं आहे तिने.
त्यापेक्षा ही आपल्या शेजारची गॅलरी बघ, अगदी नियमात चालणारी. सकाळी 9 पर्यंत कपडे गॅलरीत आलेले असतात. सगळ्या कुंड्यांमध्ये पाणी घालून झालेलं असतं. संध्याकाळी तुळशीत दिवा असतोच. वाळलेले कपडे आतही गेलेले असतात. सगळेजण मदत करतात मग सगळं छान नियोजित चालतं. हेच शिकवत हे घर.

या उलट त्या पलीकडची गॅलरी. सदा पसारा पडलेली, फरशीचे बोळे कसेही खोचलेले. तुटक्या फुटक्या वस्तु धुळीने माखलेल्या. लग्नाला आठ वर्षे झालेत पण लेकरू काही झालं नाहीए, बहुतेक चैतन्य हरवत चाललं आहे संसारातल. नात हसली, आजी उगाच काही गेस करू नकोस. गेस नाही ग, होत असं मला नेहमी वाटतं. घर उदास व्हायला बरीच कारण असतात. कधी दोघांचे पटत नसले, एक फारच उत्साही आणि दुसरा अगदी निरुत्साही असला की त्या उत्साही असणाऱ्याची मजा निघून जात असेल. कधी तोच तो पणा येऊन पण घर उदास होतं. लेकरं असले घरात कि रोज नवे आव्हान असतात. एरवी दोघे जॉबला जातात पण आता तसं त्यांना काही आव्हान नाही लेकरांच. जॉबच तरी बघ उदास वाटतं मला ते घर.
ती झाडाजवळची गॅलरी तिथं तर. वाघ शेळी राहतात. बाई माणसाचे कपडे वाळत टाकून जाते, तसे तो वाघ येऊन कडकडून जातो. अक्कल नाही नीट वाळत घालत नाही. आता पण बघ चहा घ्यायला वाघोबा बसलाय खुर्ची टाकून शेळी येईलच चहा घेऊन. खरंच ती गरीब बाई आली. एक घोट घेताच तो कडाडला, काय कडू केलाय मला शुगर नाहीए, मी कमावतो, मला पाहिजे तसं देत जा. स्वतःला कमवायची अक्कल नाही, एक काम धड करत नाही. शेळी गपचूप गेली कप घेऊन, असं सतत चालू असतं. अग, हे घर नेहमी शिकवत ग. हक्क गाजवला की गाजवणारा शेफारत जातो आणि ऐकणारा शेळी होतो, बिचारी बाई नात म्हणाली.
त्याच्या पलीकडे जाणीव नसलेलं घर म्हणते मी. तो बघ तास तास फोनवर असतो आणि ही बिचारी जुळे लेकरं सांभाळून बेजार आहे.सासू अडकली गावी ह्या लॉक डाऊन मध्ये. एरवी ती असते एक लेकरू बघायला ह्याला नसत लेकराच काम, पण आता तरी बघावं ना. आजी, अग त्याला ‘work from home’ जास्त असेल. आजी म्हणाली, अग कसचं काय. ते गाड्यांचे शोरूम आहे त्याचे. मागे बागेत भेटली होती ती. लेकरं घेऊन तेव्हा म्हंटली होती, ह्यांच्या शोरूम मधल्या गाडीसारखी आहे मी ह्यांच्या संसारात सतत उभीच, तेव्हांच कळालं मल. पण तुला काय वाटतं काय शिकवत ते घर. तुम्ही सक्षम आहात, करू शकता तर मदत करा असं वागू नका असंच सांगतंय ना.

ती गुलमोहरा खालची गॅलरी तर बघ मस्त जगणारी, अगदी टुमदार. गॅलरीतून किती पोळ्यांचं पार्सल रोज सोडते ती बाई, अनाथाश्रमासाठी पाठवते. मस्त झोपाळा काम आवरून लवकरच पुस्तक वाचत बसलेली. परवा हाक मारून विचारलं तर म्हणाली, “समाजसेवेचे वेड बसू देत नाही, जमतील तेवढया पोळ्या पाठवते. हे गेल्या पासून तसं एकटीचं फार काम नाही आणि ह्यांच्या आजारपणामुळे बरीच पुस्तकं वाचण्याचं राहील होतं, ते आता पूर्ण करते. बघ आलेलं एकटेपण धीराने स्वीकारत प्रसन्न पणे जगायला शिकवते ती गॅलरी.
नात म्हणाली, “आजी अग कोणी आपली गॅलरी बघून पण म्हणत असेल हे घर काय शिकवतं!” आजी हसली म्हणाली, “हो सगळेच घर शिकवते, तसं आपली गॅलरी पण शिकवत असेल ना?”
तुम्हीच सांगा तुमची गँलरीं
काय सांगते !!!!!!


जीवन विकास

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)



This post first appeared on स्पंदन, please read the originial post: here

Share the post

लॉकडाऊन मधली घरं.

×

Subscribe to स्पंदन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×