Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

भारताने संयुक्त राष्ट्रात अमेरिका आणि इस्रायलला दिला झटका!

स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात ७ ऑक्टोबर २०२३ पासून युद्ध सुरू आहे. इस्रायल-हमासने चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवावे, असे भारताने अनेक वेळा म्हटले आहे. युद्ध हे कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. दरम्यान, इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन राज्यांसाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या प्रयत्नांना भारताने गुरुवारी पाठिंबा दिला.India attacked America and Israel in the United Nations


  • चीनविरुद्ध AUKUS मध्ये सामील होणार जपान; अमेरिका-ब्रिटनसोबत हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर काम करणार

भारताने पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्र संघाचे पूर्ण सदस्यत्व देण्याची वकिली केली आहे. यासह भारताने आशा व्यक्त केली आहे की संयुक्त राष्ट्र संघाचे पूर्ण सदस्य बनवण्याच्या पॅलेस्टाईनच्या अर्जावर अमेरिकेने गेल्या महिन्यात व्हेटोचा वापर केला होता, त्यावर पुनर्विचार केला जाईल. हे जागतिक संघटनेचे सदस्य होण्याच्या त्याच्या प्रयत्नांना समर्थन देईल.

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या, “भारत द्वि-राज्य समाधानाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे. पॅलेस्टिनी लोकांनी इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षित सीमेमध्ये स्वतंत्रपणे राहायला हवे. कंबोज पॅलेस्टाईनच्या संयुक्त राष्ट्रात केलेल्या अर्जावर पुनर्विचार करण्याबाबत बोलल्या, भारताच्या या पावलाकडे अमेरिका आणि इस्रायलला धक्का म्हणून पाहिले जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिका पॅलेस्टिनी राज्याला धोका म्हणून पाहतात.

India attacked America and Israel in the United Nations

महत्वाच्या बातम्या

  • उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या मातीत हाणली पवारांची कॉपी!!; कोण कुणाच्या हातात काय देणार??, विचारणा केली!!
  • Salman Khan Firing: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने केली आत्महत्या!
  • मोदींच्या महाराष्ट्र मोहिमेनंतर योगींची दक्षिण महाराष्ट्रावर स्वारी!!; सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगलेत तुफानी सभा!!
  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने EVM-VVPAT शी संबंधित प्रोटोकॉल बदलला!


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

भारताने संयुक्त राष्ट्रात अमेरिका आणि इस्रायलला दिला झटका!

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×