Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

आधी धुडकावले प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण; पण अमेठी – रायबरेलीतून अर्ज भरण्यापूर्वी धरावे लागणार रामाचे चरण!!

नाशिक : आधी धुडकावले प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण, पण अमेठी रायबरेलीतून अर्ज भरण्यापूर्वी धरावे लागणार रामाचे चरण!!, असेच काँग्रेसमधल्या भावा – बहिणीचे होणार आहे.Rahul and Priyanka Gandhi may contest from amethi and raibareli but before that they will go to ayodhya!!

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अखेर आपल्या गृहराज्यात परतून अमेठी आणि रायबरेली इथून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने आली असून अमेठी आणि रायबरेली इथून अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल आणि प्रियांका गांधी हे भाऊ – बहीण अयोध्येत जाऊन बालक रामांचे दर्शन घेणार असल्याची बातमी त्याच सूत्रांनी दिली आहे. हे तेच गांधी परिवाराचे भाऊ – बहीण आहेत, ज्यांनी अयोध्येतील बालक रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण धुडकावले होते, पण आता उत्तर प्रदेशात अमेठी आणि रायबरेलीतून अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांना त्याच रामाचे चरण धरावे लागणार आहेत.

वास्तविक काँग्रेसच्या प्रमुख नेत्या म्हणून सोनिया गांधींना, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांना अयोध्येतील बालक रामांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण संयोजकांनी दिले होते. परंतु संबंधित प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भाजप पुरस्कृत आणि केंद्रित असून त्याला उपस्थित राहणे शक्य नाही, असे सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी संयोजकांना पत्र लिहून कळविले होते, राम मंदिराचे निमंत्रण धुडकावण्याचाच हा प्रकार होता. पण ज्या बालक रामांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण धुडकावले, त्याच बालक रामांचे निवडणुकीपूर्वी निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी चरण धरण्याची वेळ गांधी बहीण – भावावर आली आहे. कारण उत्तर प्रदेश सह संपूर्ण देशात मोदी लाट आहे आणि ती लाट झोपवण्यासाठी रामचरण धरण्याची वेळ गांधी परिवारावर आली आहे.

2014 च्या निवडणुकीत राहुल गांधींचा अमेठीतून निसटता विजय झाला होता पण त्याचा धडा घेऊन राहुल गांधींनी 2019 मध्ये अमेठी बरोबरच केरळच्या वायनाड मधून अर्ज दाखल केला होता. अमेठीतील पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी केरळचे वायनाड गाठले होते आणि राहुल गांधींचा अमेठीतला अंदाज बरोबर ठरला होता. अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला. पण वायनाड मधून ते लोकसभेत पोहोचले.

पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वायनाडचे सीटही धोक्यात आल्याची बातमी आहे. तिथे भाजप आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राहुल गांधींच्या विरोधात “तगडे” उमेदवार दिल्याने राहुल गांधींचा संभाव्य “विजय” डळमळला आहे. त्यामुळे राहुल गांधींना अमेठी या स्वगृहाचे वेध लागल्याचे बोलले जात आहे. ते 1 मे किंवा 3 मे रोजी अर्ज दाखल करून अमेठीत शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

– सोनियांच्या जागी प्रियांका

सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघ सोडून दिल्यानंतर तिथून प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्या देखील राहुल गांधी यांच्या समावेत आयोजित जाऊन बालक रामांचे दर्शन घेऊन नंतरच अर्ज दाखल करणार आहेत. 

पण आता प्रियांका गांधी रायबरेलीतून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या मैदानात उतरून आपले नशीब आजमावणार आहेत. आपल्या आजीचे बोल खरे ठरतील की जनतेचा कौलच आजीच्या बोलांपेक्षा महत्त्वाचा ठरेल??, यावर प्रियांका गांधींचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

Rahul and priyanka Gandhi may contest from amethi and raibareli but before that they will go to ayodhya!!

महत्वाच्या बातम्या

  • कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था पवारांनी बळकावली; उदयनराजेंचा साताऱ्यातून थेट हल्लाबोल!!
  • पवारांची मानभावी माफी त्यांच्यावरच उलटली; अमरावतीत शाह – फडणवीसांनी सादर केली पवारांच्या चुकांची यादी!!
  • मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ
  • तुम्ही काँग्रेसला मतदान करा किंवा करू नका, निदान माझ्या अंतयात्रेला तरी या; कलबुर्गीच्या मतदारांवर मल्लिकार्जुन खर्गेंचा वैताग!!


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

आधी धुडकावले प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण; पण अमेठी – रायबरेलीतून अर्ज भरण्यापूर्वी धरावे लागणार रामाचे चरण!!

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×