Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

“सागरावर” जाऊन पूर्ण शरणागती, की मुलीला वाचवण्यासाठी दुसऱ्या नातवाचा “राजकीय बळी”??

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातले घमासान केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या भाषणाने खऱ्या अर्थाने सुरू झाले असले, तरी बारामतीत काही वेगळेच “शिजत” असल्याची बातमी समोर आली आहे. बातमी जरी समोरून आली असली, तरी बारामतीच्या मूळच्या सवयीनुसार या घडामोडी पडद्याआडच घडल्या आहेत. Sharad pawar surrendered to save supriya sule from baramati

बारामतीतली “लंच डिप्लोमसी” फसली. त्यामुळे मुंबईत “सागर”वर जाऊन “डिनर डिप्लोमसी” करावी लागल्याची बातमी लीक झाली. पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत असायचे, पण आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करू लागले आहेत, अशा बाता जाहीर भाषणांमध्ये मारणे निराळे, अकेला क्या करेगा??, अशा गप्पा हाणणे निराळे आणि प्रत्यक्ष राजकीय दृष्ट्या आपल्या गळ्याशी आल्यानंतर पूर्ण शरणागती पत्करणे निराळे!!, असेच काहीसे घडल्याची बातमी सध्या “सुटली” आहे.


  • मिचॉन्ग चक्रीवादळ आज तामिळनाडू-आंध्र प्रदेशात धडकणार; एनडीआरएफची 21 पथके तैनात, 4-5 डिसेंबर रोजी शाळा-कॉलेज बंद

बारामतीत “लंच डिप्लोमसी” फसली. त्यानिमित्ताने कार्यक्रमात भाषणाची संधी जरूर मिळाली, पण त्यात देखील सरकारची स्तुती करावी लागली. त्यामुळे खऱ्या अर्थाने बारामती “धोक्यात” आल्याची जाणीव झाली. आता तो “धोका” टाळायचा, तर कुठलातरी गनिमी कावा करावाच लागेल हे जाणून घेऊन किंवा याची “जाणीव” होऊन शेवटी मुंबईत “सागर” तीरी जावे लागले, ते देखील रात्रीच्या अंधारात!! पोलिसांचा “बंदोबस्त” व्यवस्थित मॅनेज करून!!

पण तिथे काही “नळी” मिळाली नाही. त्यामुळे गुळमटच जेवण जेवावे लागले. दोन – अडीच तास चर्चेचे “गुळपीठ” पाडावे लागले. एवढे करूनही हाताला काही लागले का नाही??, याची खात्री देता आली नाही… हाताला काही लागले असल्यास ते नेहमीच्या आपल्या “अटी शर्तींवर” लागले असेल का?? याविषयी शंका आली… त्यामुळेच बारामतीचा वेगळा डाव सुरू झाल्याची दाट शंका निर्माण झाली!! मुलीला वाचवण्यासाठी दुसऱ्याच नातवाचा राजकीय बळी देण्याचे घाटू लागले. मग तो नातू आपल्या बंडखोर पुतण्याचा पुतण्या का असेना?? काय हरकत आहे??, असा विचार झाला!!

2019 च्या निवडणुकीत तसाही मावळातून एका नातवाचा “राजकीय बळी” दिलाच होता ना!!… पण त्याला “कवडीचीही किंमत” नव्हती… खरी ठिणगी तर, तिथेच पडली होती… पण आता परिस्थिती पूर्ण पालटली. मुलगीच “गंभीर” अडचणीत सापडली!!

ज्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातले 48 लोकसभेचे मतदार संघ पिंजून काढायचे, आपल्या नेतृत्वाखाली “तडफेने” ठाकरे + नानांना  फिरवायचे, ते राहिले बाजूला. त्याऐवजी आपल्या लाडक्या बारामतीत तळ ठोकण्याची वेळ आली. तिथे “लंच डिप्लोमसी” साधण्याचा प्रयत्न करावा लागला. ती फेल गेल्यानंतर “सागर तीर” गाठावा लागला. मुलीला वाचवण्यासाठी “सागराच्या” नाकदुऱ्या काढाव्या लागल्या आणि कोणत्याही स्थिती मुलगी वाचावीच म्हणून पुतण्याच्या पुतण्याला म्हणजेच आपल्या दुसऱ्या नातवाला “राजकीय बळी” देण्याचे ठरवावे लागले… याला दुसरे काय म्हणावे??

*दोन ओंडके जाती, सागरास भेट, 

नळी नाही तोडाया ती, जेवण गुळमट!! 

परी मिळेल ना ती खात्री, मुलगी वाचायाची

देवेंद्रधीन उरली आता “सुप्रिय” बारामती!!*

Sharad pawar surrendered to save supriya sule from baramati

महत्वाच्या बातम्या

  • भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा
  • ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ
  • हरियाणा पोलिसांना यश, इनेलोचे नेते नफे सिंह राठी खूनप्रकरणी गोव्यातून 2 शूटर्सना अटक
  • लालूंनी काल पाटण्यातून मोदींना दिली “संधी”; मोदींनी आज चेन्नईतून उडवली DMK – INDI परिवारवादाची “दांडी”!!
  • सनातन धर्माचा अपमान; सुप्रीम कोर्टाची उदयनिधी स्टालिनला सणसणीत चपराक!!


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

“सागरावर” जाऊन पूर्ण शरणागती, की मुलीला वाचवण्यासाठी दुसऱ्या नातवाचा “राजकीय बळी”??

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×