Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

बंगाल भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कारला अपघात; थोडक्यात बचावले, 3 जण जखमी, चौकशीची मागणी

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांत मजुमदार यांच्या कारला रविवारी अपघात झाला. या अपघातातून ते थोडक्यात बचावले, पण त्यांच्या कारमधून प्रवास करणारे तीन जण जखमी झाले. या अपघातानंतर सुकांत मजुमदार यांनी हा अपघात राज्यातील विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा कट आहे का, याचा तपास करण्याची मागणी केली.

पोलिसांचा हवाला देत, पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेने वृत्त दिले की, सुकांत मजुमदार यांची कार नादिया जिल्ह्यातील शांतीपूर येथे राष्ट्रीय महामार्ग-34 वर पोलिस बॅरिकेडला धडकल्याने अपघात झाला. सुकांत मजुमदार तेव्हा फुटबॉल स्पर्धेत उपस्थित राहून परतत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची कार बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. Bengal BJP State President’s Car Accident; Narrow escape, 3 injured, inquiry demanded

बंगाल भाजपचे प्रमुख पुढे म्हणाले की, कारमधील ३ जण जखमी झाले आहेत. मी बचावलो पण माझ्या कारमध्ये प्रवास करणारे तीन जण जखमी झाले. बस महामार्गाच्या कडेला अडवत असल्याने चालकाने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी बसविलेल्या बॅरिकेडवर कार आदळली.

दरम्यान, बंगाल भाजपने ट्विटरवर पोलिस पायलट वाहनासह दोन कारचे छायाचित्र शेअर केले आणि दावा केला की सुकांत मजुमदार प्राणघातक हल्ल्याचे बळी ठरले. यादरम्यान भाजपने कॅप्शनमध्ये माहिती दिली, “बंगालच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे मजुमदार बचावले. जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”

एका पोलीस अधिकाऱ्याने या अपघातासाठी रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला जबाबदार धरले, तर भाजपच्या दाव्याला उत्तर देताना बंगाल पोलिसांनी सांगितले – सुकांत मजुमदार राष्ट्रीय महामार्ग-34 वरून कृष्णनगरकडे जात असताना त्यांच्या सुरक्षेत CISF सामील होते. शांतीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपूर जवळ वाहनाने कारला धडक दिल्याने “किरकोळ नुकसान” झाले.

Bengal BJP State President’s Car Accident; Narrow escape, 3 injured, inquiry demanded

महत्वाच्या बातम्या

  • दिल्ली लोकसभेसाठी बांसुरी स्वराज, मनोज तिवारी यांच्यासह 4 नव्या चेहऱ्यांना तिकीट; दिल्लीत पाच जागांवर भाजपचे उमेदवार
  • भाजपच्या पहिल्या यादीत एक मुस्लिम उमेदवार, जाणून घ्या कोण आहेत अब्दुल सलाम, केरळमध्ये लढवणार निवडणूक
  • भारतीय ॲप्स हटवण्याची तयारीत असलेल्या गुगलला दणका, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुनावले
  • हिंद महासागरात चीनला भारताचे चोख उत्तर; मॉरिशसमध्ये भारतीय तळ तयार


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

बंगाल भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कारला अपघात; थोडक्यात बचावले, 3 जण जखमी, चौकशीची मागणी

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×