Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

ढवळ्याशेजारी बांधला पवळा, राहुल पाठोपाठ लालूंनी मोदींचा “परिवार” काढला; संपूर्ण “देश परिवार” मोदींभोवती एकवटला!!

नाशिक : ढवळ्या शेजारी बांधला पवळा, राहुल पाठोपाठ लालूंनी मोदींचा परिवार काढला आणि त्यामुळे संपूर्ण “देश परिवार” मोदींभोवती एकवटला!!, असेच चित्र निर्माण झाले.Lalu prasad yadav targets PM Modi with derogatory words, but BJP and social media influencers gave befitting reply

काहीही झाले, तरी कुठलीही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करून त्यांच्या भोवती केंद्रित करू नका त्याचा दुष्परिणाम विरोधकांना भोगाव लागतो, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांच्या कानी कपाळी ओरडून झाले, पण विरोधक काही सुधरायला तयार नाहीत. आतापर्यंत फक्त राहुल गांधीच नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका करून काँग्रेसवर पराभवाचे बालंट ओढवून घेत होते. पण आता त्यामध्ये 75 वर्षांच्या लालूप्रसादांची देखील काल भर पडली. 54 वर्षाच्या ढवळ्यात शेजारी 75 वर्षांचा पवळा बांधला. त्याचा वाण नाही, पण गुण लागला आणि लालूप्रसादांनी पाटण्याच्या गांधी मैदानावर मोदींचा “परिवार” काढला. तो “परिवार” काढताना देखील त्यांची जीभ एवढी घसरली की वयाच्या 75 व्या वर्षी आपल्यात राजकीय प्रगल्भता नावाला देखील शिल्लक उरलेली नाही हेच लालूंनी दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवार वादावर टीका करतात. जास्त मुले असलेल्यांचा द्वेष करतात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा परिवार का नाही?? त्यांना मुले का झाली नाहीत?? ते हिंदू देखील नाहीत. कारण त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांनी मुंडन केले नव्हते, असे एकापाठोपाठ एक सवाल करून वेगवेगळे “जावईशोध” लालूप्रसादांनी गांधी मैदानावर लावले. मोदींना आपण तिखट शब्दांत घेरल्याचा भास लालूप्रसादांना झाला.


  • विरोधकांचा 2024 साठी चाललाय झगडा; मोदींचा तयार झालाय “विकसित भारत 2047” चा आराखडा!!

पण प्रत्यक्षात त्याचा पूर्ण उलटाच परिणाम झाला. मोदींचा संपूर्ण “देश परिवार” त्यांच्या भोवती एकवटला. तेलंगणातल्या सभेत पंतप्रधान मोदींनी 140 कोटींचा हा सगळा देशच माझा परिवार आहे, अशी जोरदार घोषणा केली आणि त्या पाठोपाठ भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट वर डीपी बदलले. संपूर्ण देश हा मोदीचाच परिवार असल्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला. त्याला लाखा – लाखांचे, कोट्यावधींचे व्ह्यूज मिळायला लागले आणि लालूंचा “मोदी परिवार प्रयोग” सपशेल फसला!!

आत्तापर्यंत फक्त राहुल गांधीच मोदींवर वैयक्तिक टीका करत होते, पण त्या टीकेचा काँग्रेसला तोटा होतो, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वारंवार दाखवून दिले होते. पण राहुल गांधींनी प्रशांत किशोर यांचे काही ऐकले नाही. ते मोदींवर टीका करतच राहिले आणि काँग्रेसवर पराभवाचे बालंट ओढवून घेतच राहिले.

पण राहुल गांधींचे ठीक आहे ते फक्त 54 वर्षांचे आहेत. ते नेहरू – गांधी परिवाराचे “प्रिन्स” आहेत. त्यामुळे “राजकीय प्रगल्भता” हे शब्द देखील त्यांच्या आसपास फिरत नाहीत. पण लालूप्रसारांचे तसे नाही. ते बिहारचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रात रेल्वेमंत्री राहिले. एकेकाळी मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांची व्याख्याने झाली. पण चारा घोटाळ्यात त्यांना तुरुंगाची वारीही घडली. आजही त्यांच्या वेगवेगळ्या केसेस वेगवेगळ्या कोर्टामध्ये सुरू आहेत. या सगळ्यातून त्यांना काही “राजकीय प्रगल्भता” येईल असे वाटले होते.

पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. 54 वर्षांच्या ढवळ्या शेजारी 75 वर्षांचा पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला!! राहुलच्याच वाटेवर जाऊन लालूप्रसादांनी मोदींवर वैयक्तिक अश्लाघ्य टीका केली आणि त्याचा परिणाम उलटाच होऊन मोदींभोवतीच निवडणूक केंद्रित झाली. मोदींचा संपूर्ण “देश परिवार” त्यांच्या भोवती एकवटला!!

Lalu prasad yadav targets PM Modi with derogatory words, but BJP and social media influencers gave befitting reply

महत्वाच्या बातम्या

  • दिल्ली लोकसभेसाठी बांसुरी स्वराज, मनोज तिवारी यांच्यासह 4 नव्या चेहऱ्यांना तिकीट; दिल्लीत पाच जागांवर भाजपचे उमेदवार
  • भाजपच्या पहिल्या यादीत एक मुस्लिम उमेदवार, जाणून घ्या कोण आहेत अब्दुल सलाम, केरळमध्ये लढवणार निवडणूक
  • भारतीय ॲप्स हटवण्याची तयारीत असलेल्या गुगलला दणका, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुनावले
  • हिंद महासागरात चीनला भारताचे चोख उत्तर; मॉरिशसमध्ये भारतीय तळ तयार


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

ढवळ्याशेजारी बांधला पवळा, राहुल पाठोपाठ लालूंनी मोदींचा “परिवार” काढला; संपूर्ण “देश परिवार” मोदींभोवती एकवटला!!

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×