Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

शेख शहाजहान सहानुभूती दाखवायच्या लायकीचा आरोपी नाही; त्याच्यावर 42 केसेस, 10 वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील!!

कोलकत्ता हायकोर्टाचे संतप्त ताशेरे!!

विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : शेख शहाजहान हा सहानुभूती दाखवायच्या लायकीचा आरोपी नाही. त्याच्यावर तब्बल 42 केसेस आहेत. त्याला पुढची 10 वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील, अशा कठोर शब्दांमध्ये कोलकत्ता हायकोर्टाने संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शेख शहाजहान याच्यावर ताशेरे ओढले. त्याला कोर्टाने 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवून दिले. Sheikh Shahjahan is not an accused worthy of sympathy

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारच्या पोलिसांनी शेख शहाजहान याला 55 दिवसानंतर अटक करून बशीरहाट मधल्या कोर्टात कोर्टासमोर हजर केले. त्याला कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, पण शेख शहाजहान याच्या वकिलांनी कोलकत्ता हायकोर्टात धाव घेत त्याला जामीन मागितला. त्यावर कोलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवगणम यांनी कठोर शब्दांमध्ये वकिलांची कानउघडणी केली. शेख शहाजहान आणि त्याच्या वकिलांना फटकारले.

आम्ही तुमची कोर्टासमोर येण्याची वाटच पाहत होतो. शेख शहाजहान याच्याविरुद्ध 42 केसेस पेंडिंग आहेत. काही केसेस 20 वर्षे जुन्या आहेत. शेख शहाजहान हा आरोपी सहानुभूती दाखवायच्या लायकीचा नाही. त्याला आणि वकिलांना पुढची 10 वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार आहेत, अशा कठोर शब्दांमध्ये मुख्य न्यायाधीशांनी शेख शहाजहान याच्या कारनाम्यांवर कठोर ताशेरे ओढले.

पश्चिम बंगाल मधल्या रेशन घोटाळ्यातला शेख शहाजहान हा एक आरोपी आहे. याच घोटाळ्यात ईडीने त्याच्या ठिकाणांवर छापे मारण्याचा प्रयत्न केला असताना त्याच्या गुंडांनी ईडीच्या पथकावर हल्ला केला होता. त्यानंतर शेख शहाजहान हा देशभर कुप्रसिद्ध झाला.

पण शेख शहाजहान याच्यावर फक्त रेशन घोटाळ्याचा आरोप नाही तर त्यापलीकडे जाऊन त्याने गेल्या 20 वर्षांमध्ये खूप गंभीर गुन्हे केले आहेत. तोच संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टमाईंड आहे. आपल्याला आवडेल ती हिंदू महिला आणून तिच्यावर अत्याचार करणे, आपल्या गुंडांना महिला पुरवणे असले उद्योग त्याने वर्षानुवर्षे केले होते. पण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा तो पदाधिकारी असल्याने त्याच्या सगळ्या कारनाम्यानवर ममता बॅनर्जी आणि तिथल्या पोलिसांनी पांघरून घातले होते. संदेशखाली मध्ये काही दिवसांपूर्वी संतप्त महिलांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढला होता. त्यामुळे शेख शहाजहानने केलेले अत्याचार सगळ्या देशात समजले होते. त्याच्या विरुद्ध वातावरण तयार झाले. खुद्द ममता बॅनर्जींना त्याची राजकीय डोकेदुखी झाल्याने खुलासे करावे लागले.

संदेशखालीतील महिलांनी एकत्र येऊन शेख शहाजहान याचा भावाचे फार्म हाऊस जाळून टाकले होते. त्याच्या विरोधात प्रचंड संताप उसळल्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांना त्याच्या विरोधात कारवाई करावी लागली. पण त्याला अटक करताना देखील पश्चिम बंगाल पोलिसांनी चलाखी करत त्याच्याविरुद्ध महिला अत्याचार प्रतिबंधक 354 कलम लावले नाही. त्याला बाकीच्या कलमानखाली अटक केली आहे.

पण तरी देखील कोलकत्ता हायकोर्टाने शेख शहाजहान याच्या विरोधातल्या सर्व केसेसचा बारकाईने विचार करून पहिल्याच सुनावणीत त्याच्यावर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले. इतकेच नाहीतर पुढची 10 वर्षे त्याला कोर्टाच्या चक्रात माराव्या लागतील, असा स्पष्ट शब्दात इशारा देऊन त्याचे राजकीय करिअर पूर्ण संपुष्टात आणण्याचेच सूचित केले. तृणमूळ काँग्रेसने देखील आता उशिराने जाग येत त्याला पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे.

Sheikh Shahjahan is not an accused worthy of sympathy

महत्वाच्या बातम्या

  • शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • वाजवा तुतारी, गाडा गद्दारी; मात्र बारामतीत व्हायरल केले पत्र “निनावी”!!
  • सीबीआयने अखिलेश यादव यांना पाठवले समन्स
  • केंद्रात महाराष्ट्रातलेच कृषिमंत्री असताना विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज मधल्या मध्ये लुटले जायचे; यवतमाळ मधून मोदींचा हल्लाबोल!!


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

शेख शहाजहान सहानुभूती दाखवायच्या लायकीचा आरोपी नाही; त्याच्यावर 42 केसेस, 10 वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील!!

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×