Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

फडणवीसांना शिव्या, टोपेंना टाळ्या; लक्षात येतेय का, कोण करतेय खेळ्या??


नाशिक : मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन त्यांच्याच समर्थकांनी संशयाच्या फेऱ्यात आणल्यावर ते खवळले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आई माई काढत त्यांच्यावर बरसले आणि पूर्णपणे अडचणीत आले. मनोज जरांगे यांचे आंदोलन पूर्ण “एक्स्पोज” झाले. त्या आंदोलनामागे कोण मास्टरमाईंड आहे याचे खुलासे त्यांच्या आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या समान नॅरेटिव्ह मधून समोर आले आणि जरांगेंच्या भडक्यात आणखी भर पडली. ते सतत वाहवत गेले आणि आता राज्य सरकारने नेमलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या स्कॅनर खाली आले. Who is mastermind?? Photograph of manoj jarange and rajesh tope together clapping each other!!

या सगळ्या घटनाक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सगळी पाळेमुळे खणून काढायचे ठरवल्याबरोबर माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढे आले आणि आपला यात कणभर जरी दोष असेल तरी आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशी घोषणा कर्ते झाले, पण दरम्यानच्या काळात “फडणवीसांना शिव्या आणि टोपेंना टाळ्या” हा मनोज जरांगे यांचा राजेश टोपे यांना टाळ्या देत असलेला फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान अंतर्वली सराटीत दगडफेक कोणी, कशी, केव्हा केली?? त्यासाठी कुठल्या कारखान्यातून सर्व प्रकारचे “इंधन” पुरवले गेले??, त्या कारखान्याची मालकी कोणाकडे आहे?? याच्या तपशीलवार चर्चा सोशल मीडियातून समोर आल्या. मनोज जरांगेंच्या बैठका कुठे आणि कुणी घेतल्या?? गुप्त बैठकांमधले संदेश एकमेकांना कसे पोहोचले??, याचे सगळे खुलासे बाहेर आले. त्यामुळे राजेश टोपे पुरते अडचणीत आले.


  • मनोज जरांगेंच्या तोंडी पवार + सुळे + राऊतांचीच भाषा; उघड्यावर आली आंदोलनाची दिशा!!

राजेश टोपेंच्या “हालचालींना” “ब्रेक”

राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन आपल्याबरोबर 6 आमदार राष्ट्रवादीच्या गोटात आणण्याची तयारी दाखवली होती, पण त्याला अचानक “ब्रेक” लागला. याच टाइमिंग दरम्यान मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवर “अचानक” भडकले आणि सगळ्याच प्रकरणाला एक “वेगळे” वळण लागले. याचा सहज थांगपत्ता कोणाला लागला नाही. पण राजेश टोपे यांनी अजित पवारांची भेट घेऊन 6 आमदार राष्ट्रवादीच्या गोटात आणण्याची तयारी दाखवणे, त्याच वेळी संजय राऊत यांनी एका दिवसात भाजप संपवू असे म्हणणे आणि तेच नॅरेटिव्ह पुढे नेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देणे, हा घटनाक्रम एकापाठोपाठ घडला. त्यामुळे मराठा आंदोलन पूर्णपणे संशयाच्या गर्तेत अडकले हे “सहज” किंवा योगायोगाने घडलेले नाही.

त्यातूनच फडणवीसांना शिवाय शिव्या आणि टोपेंना टाळ्या हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आणि मराठा आंदोलनातला मास्टरमाईंडचा एक घटक उघडा पडला!!

“गौडबंगाल” बाहेर येणार

शिंदे – फडणवीस सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशीतून मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनातील सगळे “गौडबंगाल” बाहेर येईलच, पण त्यांचे समर्थक आताही तीन दिवसात सगळे ब्राह्मण संपवून. फडणवीसांना संपवू, अशा धमक्या देत आहेत आणि त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. सगळे स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या चौकशीच्या कक्षेत येणार आहे. त्यामुळे अधिकृत पातळीवर सगळी पोलखोल होणारच आहे. पण तूर्त तरी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर “अचानक” भडकणे आणि राजेश टोपे यांच्या “हालचालींना” त्याच वेळी “ब्रेक” लागणे, आपण दोषी आढळलो, तर राजकारण संन्यास घेऊ, असे वक्तव्य राजेश टोपे यांनी करणे हे घडले आहे, हा घटनाक्रम अधोरेखित करून ठेवली पाहिजे!!

Who is mastermind?? Photograph of manoj jarange and rajesh tope together clapping each other!!

महत्वाच्या बातम्या

  • लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी मंत्री भाजपमध्ये जाणार
  • द फोकस एक्सप्लेनर : कसे होते राज्यसभेसाठी मतदान? किती आमदारांच्या मतांनी निवडून येतो खासदार? वाचा सविस्तर
  • 28 फेब्रुवारी रोजी पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी, येथून प्रक्षेपित होणार छोटे रॉकेट
  • जरांगेंना शिंदेंच्या कॅम्पमध्ये “ढकलून” पवार कॅम्पचा “अलिप्त” होण्याचा “बौद्धिक” प्रयत्न!!


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

फडणवीसांना शिव्या, टोपेंना टाळ्या; लक्षात येतेय का, कोण करतेय खेळ्या??

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×