Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : मनोज जरांगे यांची उर्मट वक्तव्ये, त्यांच्या आंदोलनाला असलेली विशिष्ट पक्षाची फूस हे सगळे शिंदे – फडणवीस सरकारने नेमलेल्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या “स्कॅनर”खाली आल्याबरोबर सुरुवातीला मनोज जरांगे “नरमले.” त्यांच्या पाठोपाठ राजेश टोपे यांनी आपला या प्रकरणातला हात झटकून टाकला आणि त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी पुढे येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असभ्यतेचा आरोप करत मनोज जरांगे यांची अप्रत्यक्षपणे बाजू उचलून धरली. Manoj jarange uses abusive language, but sharad pawar targets devendra fadnavis as rude leader

मनोज जरांगे तोल सुटल्यासारखे बोलायला लागल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची आई माई काढली. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा फडणवीसांच्या भोवती एकवटली. सर्वपक्षीय आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मनोज जरांगे आणखी भडकले. फडणवीसांवर तसाच हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नात आपल्या तोंडून चुकून आईमाई गेली असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो, असे ते बोलून गेले पण आमच्या आई मायावर फडणवीसांनी गोळ्या घातल्या लाख्या मारल्या असे बेछूट आरोप केले. जरांगेंपाठोपाठ राजेश टोपे यांनी खुलासा केला. आपला त्या आंदोलनात काही हात असेल तर आपण असल्याचे सिद्ध झाले, तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी घोषणा त्यांनी केली.


  • मनोज जरांगेंची नाहक बदनामी; शिवबा संघटनेचे वकील वाजिद खान, म्हस्के पाटलांनी बाजू लावून धरली!!

त्यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असभ्यतेचा आरोप केला यासाठी त्यांनी स्वतःच्या 50 वर्षांच्या राजकारणाचा नेहमीचा हवाला दिला.

शरद पवार म्हणाले :

खरं सांगायचे तर जबाबदार लोकांचे वक्तव्य जबाबदार असलं पाहिजे. जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे महाराष्ट्रात कधीही पाहिले नाही. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचे वक्तव्ये पाहिली.

जरांगे यांचा माझ्यासोबत संबंध बोलायचे तर त्यांचे उपोषण सुरु झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो होतो. मी त्यांना भेटून एवढेच सांगितले होते की, तुमच्या मागण्या संदर्भातील आग्रह समजू शकतो. पण दोन समाजात अंतर वाढेल असे काही करु नका. महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य टिकेल, असे करा. तुमच्या समाजासाठी आग्रही समजू शकतो. पण इतर समाजासाठी हे योग्य दिसणार नाही. एवढाच त्यांचा आणि माझा संवाद झाला.

त्यानंतर आजपर्यंत एका शब्दाने माझे आणि जरांगे यांचे बोलणे नाही किंवा भेट नाही. असे असताना उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असभ्य वाटतेय.

राजेश टोपे यांची पाठराखण

मनोज जरांगे यांना राजेश टोपे यांनी फौज दिल्याचे आरोप झाले त्यावर स्वतः राजेश टोपे यांनी खुलासा केला पण पवारांनी त्यांची पाठराखण केली. राजेश टोपे यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. मला माहिती आहे, की हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार राजेश टोपे यांची मदत घेत होते. कारण त्यांचे ते शेजारी आहेत. एका बाजूने त्यांची मदत घेणे आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर आरोप करणे ही भूमिका असेल तर काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारवर कोण विश्वास ठेवेल??

फोन केल्याचे सिद्ध करा

मनोज जरांगे यांनी आरोप केल्यानंतर आता त्यांच्या आदोलन प्रकरणात एसआयटी चौकशी लावली जाईल. यातून कोणत्या पक्षाचा यात हात आहे ते तपासले जाईल, असे उपमुख्यमंत्री – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सांगितले. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले. “एसआयटी चौकशी आवश्य करा. एसआयटी करा. वाटेल ती चौकशी लावा, आमची काही हरकत नाही. कर नाही त्याला डर कसला. संबंधच नाही. ते म्हणतात फोन आले. मी मनोज जरांगेंना एक फोन जरी केल्याचे सिद्ध केले तर मी वाटेल ते मान्य करेन, असे शरद पवार म्हणाले.

Manoj jarange uses abusive language, but sharad pawar targets devendra fadnavis as rude leader

महत्वाच्या बातम्या

  • लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी मंत्री भाजपमध्ये जाणार
  • द फोकस एक्सप्लेनर : कसे होते राज्यसभेसाठी मतदान? किती आमदारांच्या मतांनी निवडून येतो खासदार? वाचा सविस्तर
  • 28 फेब्रुवारी रोजी पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी, येथून प्रक्षेपित होणार छोटे रॉकेट
  • जरांगेंना शिंदेंच्या कॅम्पमध्ये “ढकलून” पवार कॅम्पचा “अलिप्त” होण्याचा “बौद्धिक” प्रयत्न!!


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!!

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×