Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अनेक वर्षानंतर अभिनेता भरत जाधव यांचा रंगभूमीवर होणार आगमनं! वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला.

विशेष प्रतिनिधी

पुणे : भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या आहेत. तसेच अनेक नकारात्मक भूमिकेतही ते झळकले. आता बऱ्याच काळानंतर भरत जाधव हे नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘अस्तित्व’ असे या नाटकाचे नाव आहे.After many Years Actor Bharat Jadhav will come to the theater!

नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतात. आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग येत्या ३ नोव्हेंबरपासून पार पडणार आहे.


  • पुण्यातील 50 कोटींच्या शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी, बनावट कागदपत्रांच्या आधारे 23 जणांची भरती

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

या नाटकात एका अशा कुटुंबाची कथा दाखवली जाणार आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. या कुटुंबात एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे.
स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पियुष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरीता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.

After many years Actor Bharat Jadhav will come to the theater!

महत्वाच्या बातम्या

  • मराठा – ओबीसी आरक्षणावरून सरकारची कोंडी करायचा काँग्रेसचा दुहेरी डाव!!
  • हाफीज सईदचा म्होरक्या दहशतवादी, लष्कर ए तैय्यबाचा कमांडर हाशिम अली अक्रमला गाजा पट्टीत ठोकले!!
  • राष्ट्रवादी आणि भाजपात ट्वीटर वॉर; शरद पवारांनी बावनकुळेंबाबत केलेलं विधान कारणीभूत!
  • धर्मवीर आनंद दिघेंच्या रुपात टेंभीनाक्यावर पोहोचला प्रसाद ओक! व्हिडीओ झाला व्हायरल !


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

अनेक वर्षानंतर अभिनेता भरत जाधव यांचा रंगभूमीवर होणार आगमनं! वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला.

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×