Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

बिहारमध्ये मोठी दुर्घटना : प्रवाशांनी भरलेली बोट गंगेत बुडाली, १२ जण गेले वाहून

जोरदार वादळादरम्यान दोन बोटींची टक्कर झाल्याने बोट उलटली.

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमध्ये गंगा नदीत बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. खरंतर, प्रकरण बिहारच्या पाटणामधील मानेर पोलीस स्टेशन परिसरातील गौरैय्या स्थान घाटातील आहे. अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे डझनभर लोक होते. जोरदार वादळादरम्यान दोन बोटींची टक्कर झाल्याने बोट उलटली. यामध्ये एक जण बेपत्ता आहे. Big Accident in Bihar Boat full of passengers sinks in Ganges 12 people are washed away

घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी घाटावर बोट नसल्याने बोटीचा शोध घेण्यात आला. पोलीस पथकाच्या मदतीने नदीतून लोकांना बाहेर काढण्यात आले. बेपत्ता झालेल्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत. तरुण बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच तरुणाच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, दुर्पटनेर्वी युवक बोटीत उपस्थित होता, मात्र यानंतर तो बेपत्ता आहे.

एसडीआरएफची टीम बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहे. दुर्गापूजेच्या निमित्ताने 24 आणि 25 ऑक्टोबरला गंगा नदीत बोटी चालवण्यावर बंदी असणार आहे. यासंदर्भात पाटणा सदरचे एसडीओ श्रीकांत कुंडलिक खांडेकर यांनी सोमवारी आदेश जारी केला. नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी गंगा नदीत बोटी चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या पावसानंतर नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

Big accident in Bihar Boat full of passengers sinks in Ganga 12 people are washed away

महत्वाच्या बातम्या

  • एकीकडे मोदी सरकार इस्रायलच्या पाठीशी; दुसरीकडे मणिशंकर अय्यरसह काँग्रेसी – डावे – समाजवादी खासदार पॅलेस्टिनी दूतावासात!!
  • पुण्यातील नवले पुलावर कंटेनरला धडकल्याने ट्रकने घेतला पेट, चार जणांचा होरपळून मृत्यू
  • Income Tax Raid : चार दिवसांत १ अब्ज रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त, ९४ कोटी रुपयांची रोकड जप्त
  • Rajasthan Election : भाजपाने उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, ‘या’ सात खासदारांना मिळाले तिकीट!


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

बिहारमध्ये मोठी दुर्घटना : प्रवाशांनी भरलेली बोट गंगेत बुडाली, १२ जण गेले वाहून

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×