Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

तामिळनाडू : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १३ जणांचा मृत्यू, लोकांमध्ये घबराट

एकापाठोपाठ दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये भीषण स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष प्रतिनिधी

विरुधुनगर : तामिळनाडूतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात एकापाठोपाठ एक दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये भीषण स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा तिथे लोक काम करत होते. या अपघातात 13 जणांना जागीच जीव गमवावा लागला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. Tamil Nadu Terrible explosion in firecrackers factory 13 dead panic among people

अग्निशमन आणि बचाव विभागाचे म्हणणे आहे की, विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील फटाके बनवणाऱ्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून लोकांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. मात्र, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मात्र काही वेळाने त्याच जिल्ह्यातील कममपट्टी गावात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात दुसरा स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण कारखान्याला आग लागली, त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. तथापि, सुरुवातीला मृतांची संख्या 9 इतकी नोंदवली गेली होती, जी नंतर 13 झाली. या भीषण अपघातानंतर संपूर्ण गावात शांतता पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Tamil Nadu Terrible explosion in firecrackers factory 13 dead panic among people

महत्वाच्या बातम्या

  • राहुल गांधींशिवाय काँग्रेसकडून कोण असू शकतो पंतप्रधानपदाचा उमेदवार? शशी थरूर यांनी केला खुलासा
  • समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टाने ३ विरुद्ध २ मतांनी फेटाळली!!; का?? आणि कशी?? वाचा तपशील!!
  • ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
  • Same Sex Marriage : समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

तामिळनाडू : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १३ जणांचा मृत्यू, लोकांमध्ये घबराट

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×