Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

ज्योतिरादित्य सिंधिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, राज्यसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राज्यसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (13 ऑक्टोबर) फेटाळली. मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते गोविंद सिंह यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.Relief to Jyotiraditya Scindia from the Supreme Court, the petition challenging the Rajya Sabha Elections was dismissed

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत, गोविंद सिंह यांनी 19 जून 2020 रोजी सिंधिया यांच्या उमेदवारीला आव्हान दिले होते, कारण प्रतिज्ञापत्रासह उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांनी भोपाळमध्ये दाखल केलेल्या एफआयआरची माहिती उघड केली नव्हती.


  • आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का! मुलाला अंतरिम दिलासा देण्यास नकार

याआधीही सर्वोच्च न्यायालयाने गोविंद सिंह यांची याचिका फेटाळली होती. उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने सांगितले की, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात काँग्रेस नेते गोविंद सिंह यांच्या याचिकेत हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही.

‘निवडणूक निरर्थक घोषित करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी’

याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की सिंधिया यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात एफआयआर उघड न करून तथ्य लपवले, जे फसवणूक आणि भ्रष्ट पद्धत आहे. त्यासाठी त्यांची निवडणूक रद्द ठरवावी.

‘सिंधियावर कोणताही गुन्हा दाखल नाही’

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते की, त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी खटला नाही आणि केवळ एफआयआर नोंदवल्याने गुन्हा सिद्ध होत नाही.

विशेष रजा याचिका फेटाळताना, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले, “विवादित आदेशांमध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही प्रकरण याचिकाकर्त्याने केले नाही.” ज्येष्ठ वकील एनके मोदी आणि सिद्धार्थ भटनागर सिंधियाच्या वतीने हजर झाले होते.

Relief to Jyotiraditya Scindia from the Supreme Court, the petition challenging the Rajya Sabha elections was dismissed

महत्वाच्या बातम्या

  • सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
  • नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
  • हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
  • पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

ज्योतिरादित्य सिंधिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, राज्यसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×