Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

इस्रायलमधून 212 भारतीय एअरलिफ्ट; ऑपरेशन अजयअंतर्गत पहिले विमान दिल्लीला पोहोचले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्धादरम्यान, भारत सरकारने इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाचे विमान 212 भारतीय नागरिकांना घेऊन शुक्रवारी सकाळी दिल्लीला पोहोचले.212 Indian Airlifts from Israel; The first flight under Operation Ajay Reached Delhi

दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सर्वांचे स्वागत केले. भारतीय वेळेनुसार, गुरुवारी दुपारी 12:44 वाजता इस्रायलच्या डेव्हिड बेंगुरियन विमानतळावरून विमानाने भारतासाठी उड्डाण केले. इस्रायलमध्ये सुमारे 18 हजार भारतीय राहतात.


  • हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले

इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याला भारताने दहशतवादी हल्ला म्हटले आहे. मात्र, पॅलेस्टाइनबाबत भारताचे धोरण दीर्घकाळ तेच असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत नेहमीच वाटाघाटीद्वारे स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टाईनच्या निर्मितीचा पुरस्कार करत आला आहे. भारताची सध्या ही भूमिका आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत 2,700 लोक मारले गेले आहेत. यापैकी सुमारे 1,300 इस्रायली आहेत. आतापर्यंत सुमारे 1,400 पॅलेस्टिनींनाही आपला जीव गमवावा लागला आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांच्या सैन्याने 6 दिवसांत हमासच्या 3,600 स्थानांवर हल्ले केले आहेत. गाझावर 6 हजार बॉम्ब फेकण्यात आले आहेत. या बॉम्बचे वजन सुमारे 4 हजार टन आहे.

गाझामध्ये 447 मुलांचा मृत्यू

12 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात 151 पॅलेस्टिनी ठार झाले आणि गाझामधील एकूण मृतांची संख्या 1,417 झाली. त्यापैकी 447 मुले आहेत. तर 6,268 लोक जखमी झाले आहेत.

अल जझिराने दिलेल्या माहितीनुसार, गाझामधील 6 दिवसांत 22 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. 10 रुग्णालये आणि 48 शाळांचेही नुकसान झाले. यूएनच्या म्हणण्यानुसार गाझामधील 3 लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे.

इस्रायलमध्येही अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यांची आकडेवारी समोर आलेली नाही. परंतु अनेक अहवालांमध्ये हमासच्या हल्ल्यात 40 अर्भकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांना नवजात बालकांच्या मृतदेहांची छायाचित्रे दाखवली.

212 Indian airlifts from Israel; The first flight under Operation Ajay reached Delhi

महत्वाच्या बातम्या

  • सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
  • नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
  • हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
  • पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

इस्रायलमधून 212 भारतीय एअरलिफ्ट; ऑपरेशन अजयअंतर्गत पहिले विमान दिल्लीला पोहोचले

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×