Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Delhi Liquor Scam : मद्य धोरण घोटाळ्यात संपूर्ण ‘आप’च गुंतलेली – सुधांशू त्रिवेदींचा मोठा आरोप!

भ्रष्टाचार म्हणजे सामान्य बाब असल्याचीही केली आहे टीका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय सिंह यांना अटक केल्यानंतर आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी आमनेसामने आले आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, भाजप खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पुन्हा एकदा आम आदमी पार्टीवर निशाणा साधत संपूर्ण पक्षाला मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी घेरले आहे. तर  मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. Delhi Liquor Scam: Entire AAP involved in liquor policy scam  Sudhanshu Trivedis big accusation

भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी  सांगितले की, ”आम्हाला विश्वास आहे की देशातील लोकांसाठी जे प्रयोगशील राजकारणाबद्दल बोलतात त्यांच्यासाठी हे विचारांचे अन्न आहे. ही प्रयोगशील राजकारणाची वेळ नाही. प्रयोगशील राजकारणाचे परिणाम देशासाठी घातक ठरू शकतात. देशातील जनतेसाठी ही विचार करण्याची वेळ आहे.”

राजकारणाचा मार्ग नेहमीच निसरडा, वारंवार घसरण्याची शक्यता, पण…; शिवराज सिंह चौहान यांचे सूचक उद्गार

ते पुढे म्हणाले की, ”अण्णांच्या आंदोलनातून उदयास आलेल्या आम आदमी पक्षाच्या चारित्र्याने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. तसेच, पहिले मनीष सिसोदिया तुरुंगात गेले. त्यानंतर संजय सिंह रिमांडवर गेले आणि आता संपूर्ण आम पार्टी मद्य घोटाळ्यात अडकली आहे. आम आदमी पार्टीमध्ये भ्रष्टाचार ही आता सामान्य गोष्ट झाली आहे.”

Delhi Liquor Scam Entire AAP involved in liquor policy scam  Sudhanshu Trivedis big accusation

महत्वाच्या बातम्या

  • कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; काँग्रेस काढणार उत्तर प्रदेशात दलित गौरव यात्रा!!
  • Mahadev Betting App Case : रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांना ‘ED’चे समन्स!
  • विनायक ग्रुप आणि महाराष्ट्र सपा अध्यक्ष अबू आझमी यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाचे छापा
  • भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!!


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

Delhi Liquor Scam : मद्य धोरण घोटाळ्यात संपूर्ण ‘आप’च गुंतलेली – सुधांशू त्रिवेदींचा मोठा आरोप!

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×