Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Asian Games 2023 : भारतीय पुरुष संघाने तिरंदाजीत जिंकले सुवर्णपदक, ‘या’ तीन खेळाडूंनी दाखवली आपली ताकद!

भारतीय तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत रिपब्लिक ऑफ कोरिया संघाचा पराभव केला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत एकूण 84 पदके जिंकली आहेत. याशिवाय क्रिकेट आणि कुस्ती स्पर्धांमध्ये पदके येणे बाकी आहेत. भारतासाठी पुरुषांच्या तिरंदाजी संघाने  सुवर्णपदक पटकावले आहे. Asian Games 2023 Indian mens team won the gold medal in archery

भारताकडून ओजस देवतळे, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर निशाणा साधला. भारतीय तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत रिपब्लिक ऑफ कोरिया संघाचा पराभव केला.

ओजस देवतळे, अभिषेक वर्मा, प्रथमेश जावकर यांनी कोरियन संघाचा 235-230ने पराभव केला. भारतीय संघाने पहिल्या फेरीत 58, दुसऱ्या फेरीत 116, तिसऱ्या फेरीत 175 आणि चौथ्या फेरीत 235 गुण मिलवले. रिपब्लिक ऑफ कोरियाचे खेळाडू भारतीय खेळाडूंसमोर टिकू शकले नाहीत. त्यांना पराभूत करण्यात भारतीय संघाला कोणतीही अडचण आली नाही. भारतीय संघ फायनलमध्ये एकदाही कोरियापेक्षा मागे राहिला नाही आणि नेत्रदीपक पद्धतीने सुवर्णपदक जिंकले.

पुरुषांच्या तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकाशिवाय भारताने आज आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 12व्या दिवशी स्क्वॉशमध्ये सुवर्णपदक पटकावले. स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लीकल आणि हरिंदर सिंग यांनी स्क्वॉशच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या जोडीचा 2-0 असा पराभव केला आहे. भारताच्या महिला तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत चायनीज तैपेईचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. अशाप्रकारे भारताने 12व्यांदा तीन सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली आहे.

Asian Games 2023 Indian mens team won the gold medal in archery

महत्वाच्या बातम्या

  • सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!
  • पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत ७१ पदकं जिंकून भारताने स्वतःचाच विक्रम मोडत रचला इतिहास
  • जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

Asian Games 2023 : भारतीय पुरुष संघाने तिरंदाजीत जिंकले सुवर्णपदक, ‘या’ तीन खेळाडूंनी दाखवली आपली ताकद!

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×