Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

‘तू फक्त ट्रॅक्टर बनव तुला कारमधले काय कळते?’, लॅम्बोर्गिनी कंपनीच्या स्थापनेमागची रंजक कथा

महागड्या, चैनीच्या गाड्या म्हटलया कि फेरारी, लॅम्बोर्गिनी, मर्सीडीज, बीएमडब्लू अशी काही कार उत्पादकांची नावे आणि त्यांची काही प्रसिद्ध मॉडेल्स लगेच आपल्या डोळ्यासमोर तरळतात. ह्यापैकी प्रत्येक कंपनी सुरु होण्यामागे काही ना काही इतिहास आहे. त्यापैकी लॅम्बोर्गिनीचा इतिहास एकदम रोचक आहे.

लॅम्बोर्गिनी आणि फेरारी आता जरी एकमेकांचे स्पर्धक असले तरी लॅम्बोर्गिनी सुरु होण्यामागे फेरारीच्या मालकाचा खूप मोठा वाटा आहे.

फेरूसिओ लॅम्बोर्गिनीचा जन्म द्राक्षाची शेती करणाऱ्या कुटुंबामध्ये झाला होता. पण तो पारंपरिक शेतीपेक्षा जास्त यंत्रांमध्येच रमायचा. दुसऱ्या महायुद्धच्या काळात त्याने हवाई दलामध्ये काम केले. त्यानंतर त्याने सैन्यातील जुनी यंत्रे स्वस्तात विकत घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचा वापर ट्रॅक्टरसारखी शेतीला लागणारी विविध अवजारे बनविण्यासाठी केला.

ट्रॅक्टरच्या धंद्यामध्ये फेरूसिओ लॅम्बोर्गिनीला खूप यश मिळाले आणि त्यामुळे तो खूप श्रीमंत झाला. सामान्यतः जास्त त्या श्रीमंत माणसांना जसा वेगवेगळ्या आलिशान गाड्या जवळ बाळगण्याचा शौक असतो तसा त्याला पण शौक जडला. त्याच्या मालकीची एक फेरारी कार पण होती. हळू हळू तो ह्या गाड्या अतिवेगाने चालवून बघू लागला. त्याला यंत्रांमध्ये विशेष अभिरुची असल्यामुळे त्याच्या मालकीच्या गाड्यांमध्ये काही दोष असल्यास त्याच्या लगेच लक्षात यायचे. तो जेव्हा फेरारी वेगाने चालवत असे तेव्हा त्याच्या असे लक्षात आले कि वेगामुळे गाडी खूप आवाज करते तसेच गाडीला झटके पण खूप जाणवतात. त्यामुळे फेरारीच्या संरचनेमध्ये थोडे बदल करणे अनिवार्य असल्याचे त्याच्या लक्षात आले.

तो ६०च्या दशकातील काळ होता. एन्झो फेरारीच्या गाड्या ह्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. असे असून पण फेरूसिओ लॅम्बोर्गिनीने फेरारी गाडीमधील दोष कंपनी मालकाच्या दृष्टीस आणून द्यायचे ठरविले. पण कार क्षेत्रातील एक मोठे प्रस्थ असल्यामुळे एन्झो फेरारीला एका ट्रॅक्टर तज्ज्ञाने दिलेला सल्ला रुचला नाही त्याने फेरूसिओचा अपमान केला कि ‘तू फक्त ट्रॅक्टर बनव तुला कारमधले काय कळते?’ आणि इथूनच कार क्षेत्रातील एका मोठ्या स्पर्धेची सुरुवात झाली.

फेरारीकडून झालेल्या अपमानामुळे उलट लॅम्बोर्गिनीला उत्तेजनाच मिळाली. त्याने स्वतः आलिशान कार बनविण्याचे ठरविले आणि अवघ्या चार महिन्याच्या आत एक कार बनविली. एका मोटार शो मध्ये त्याने लॅम्बोर्गिनी ३५० जिटीवी नावाने कार उतरवली पण. त्यांनतर कधी लॅम्बोर्गिनी कंपनीने मागे वळून बघितले नाही.



This post first appeared on Garja Maharashtra, please read the originial post: here

Share the post

‘तू फक्त ट्रॅक्टर बनव तुला कारमधले काय कळते?’, लॅम्बोर्गिनी कंपनीच्या स्थापनेमागची रंजक कथा

×

Subscribe to Garja Maharashtra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×