बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे जुने नाते आहे. आता आणखी एक अभिनेत्री क्रिकेटपटूवर भाळली आहे. होय, ही अभिनेत्री भारतीय टीमच्या एका खेळाडूवर अशी काही भाळलीयं की, त्याची तारीफ करताना ती जराही थकत नाहीयं
बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे जुने नाते आहे. क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या अनेक जोड्यांनी ‘साथ जियेंगे’च्या शपथा घेतल्या. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर जहीर खान आणि सागरिका घाटगे, हरभजनसिंग आणि गीता बसरा,युवराजसिंग आणि हेजल कीच, अनुष्का शर्मा व विराट कोहली या प्रेमी युगुलांनी विवाहबंधनात अडकून क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते घट्ट केले. आता आणखी एक अभिनेत्री क्रिकेटपटूवर भाळली आहे. होय, ही अभिनेत्री भारतीय टीमच्या एका खेळाडूवर अशी काही भाळलीयं की, त्याची तारीफ करताना ती जराही थकत नाहीयं.
आता ही अभिनेत्री कोण हे आधी आम्ही तुम्हाला सांगतो. ही अभिनेत्री आहे, राशी खन्ना. बॉलिवूडमध्ये राशी खन्ना हे नाव फार परिचित नाही. पण साऊथ इंडस्ट्रीत ते एक मोठे नाव आहे. जिल, हायपर, बंगाल टायगर, शिवम आणि सन आॅफ सथ्यमूर्ती2मध्ये तिने काम केले आहे. बॉलिवूडमध्येही राशी दिसली आहे. ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात राशी जॉन अब्राहमसोबत दिसली होती. हीच राशी खन्ना यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर भाळली आहे. मी केवळ बुमराचची मॅच बघते. बुमराहसाठीचं मॅच बघते, असे म्हटले तरी चालेल, असे राशी खन्ना म्हणाली.
सोशल मीडियावरही राशी अनेकदा जसप्रीत बुमराहची प्रशंसा करताना दिसते. राशीने अलीकडे एका मुलाखतीत बुमराहबद्दलच्या तिच्या भावना बोलून दाखवल्या. अद्याप बुमराहने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता विराट, भज्जी, युवीसारखाच बुमराहही राशीच्या ‘लव्ह पिच’वर उतरतो का?बॉलिवूड व क्रिकेटचे हे नाते पुढे जाते का? हे पाहणे आता इंटरेस्टिंग ठरणार आहे.