Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Marathi Horror Story गहिरा अंधार

   Marathi Horror Story

गहिरा अंधार




“मूव्ह बाजूला सरका…..क़्विक …. क़्विक … टेक हिम टू दि ICU…. लवकर … वार्डबॉय…. बापरे किती रक्त वाहतय यांच……..” डॉक्टर…. डॉक्टर वाचेल न हो तो…बोलाना डॉक्टर” दिक्षा.. डॉक्टर ची कॉलर पकडून जोरजोरात रडत ओरडत होती. “बोलाना डॉक्टर…. हंअ…हं अहं अहं हं… प्लीज डॉक्टर…प्लीज…” हे पहा मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करीन तुम्ही थोडा धीर धरा.. “दिक्षा रडू नकोस ग.. अश्विनी ने दिक्षास डॉक्टर पासून दूर केले.. आणि बाकडावरती बसवत तीला समजावू लागली… डॉक्टर ताड ताड चलत आत मध्ये गेले… दिक्षा अश्विनी च्या खांद्यावरती आपले डोके ठेऊन ढसा ढसा रडत होती..”येईल ना ग माझा आदी परत ”अश्विनी रडत रडत तीला समजवत होती…. इकडे अमित पाणावलेल्या डोळ्यांनी दूर बाकडा वरती डोक्याला हात लावून बसला होता..कारण भावापेक्षा हि जवळचा त्याचा मित्र आज मृत्यूशी झुंज देत होता… अमितला पर्श्चाताप होत होता.. आपल्यामुळे आपला मित्र या अवस्थेत आहे….. आय सी यु मध्ये आदी मरणाच्या दाराशी येऊन ठेपला होता… एक एक क्षण त्यास जणू डोळ्यासमोर फिरताना दिसत होता.. डॉक्टर, नर्स धडपडीने.. त्याच्या छातीतून… तो धारदार लोखंडी गजाचा तुकडा बाहेर काढू पाहत होते.. पायात घुसलेल्या काचा..डॉक्टरांनी.. कचकच उपसून काढल्या.. उपसताच ते तेथे स्पिरीट लाऊन ते दाबून धरत होते…आणि आदी निपचित पडून होता.. डोक्यावर झुलणारा तो ऑपरेशन बेड वरील बल्बाकडे तो एकटक पाहत होता.. वेळ जणू त्याच्या साठी..मंद झाला होता…आदिने आपले डोळे हळुवार झाकले कि….
2 दिवसांपूर्वी ………
“भाऊ भाऊ अहो!! जरा सावकाश..!! आह आ सावकाश सावकाश हा आना आतमध्ये ठेवा तेथे.. हे घ्या तुमचे पैसे धन्यवाद !!” अमित ने टेम्पोतील सर्व सामान आपल्या नव्या घरात उतरवून घेतले आणि उतरवताच सर्व लाऊन देखील टाकले.. आतून कंबरेत खवलेला पदर काढत अश्विनी डोक्यावरील घाम पुसत अमित जवळ आली.. “झाले का रे सगळे सामान लाऊन..”ती म्हणाली अमित अश्विनी कडे पाहत म्हणाला “ हो अग! तेवढ्या क्रोकर्या किचन मध्ये ठेवल्या म्हणजे झाले…” खूप थकलीयस जरा बस ना .. “ अरे नको… अजून खूप काम आहे खाली त्या पायऱ्या जवळची ती खोली उघडत नाहीये ..ती साफ करायची राहिलीय..” अग असुदेत बस इथेच.. अमित ने अश्विनीस एका हाताने हलकेस तिला ओढून आपल्या जवळ सोफ्यावर बसवले…अश्विनी देखील त्याला न नकरता त्याच्या जवळ बसली. त्याच्या खांद्यावरती डोके ठेऊन .. घरास पाहू लागली…अमित तिच्या केसात कुरवाळत तिला म्हणाला “काय झाल आशु? काय पाहतेयस..” “आपल्या स्वप्नातील घर.. आज आपल्याला मिळाल ” अश्विनी अमित च्या हातावर हात ठेऊन म्हणाली… अमित ने तिला घट्ट आवळले.. आणि एक सुस्कारा टाकला.. “होय खरय आपल्या स्वप्नातलं घर ”… अमित तिला दुजोरा देत म्हणाला.. ..”ओह मिस्टर आज ऑफिस नाहीये का ?” अमित पुन्हा गडबडीत उठला आणि म्हणला “ओह नो खरच कि.. बॉस ओरडेल खरच निघतो मी.. मला उरकावे लागणार… घाई गडबडीत अमित ने आपले सर्व उरकून घेतल.. आणि निघाला .. अश्विनी पुन्हा आपल्या कामास लागली… कि अचानक दारात कोणीतरी ठोठवले ..ती अश्विनी ची लहान बहिण गोड गोबरे गाल ..सरळ नाक चेहरा जणू देवाने स्वतः कोरलेला ..सुंदर पाणीदार टपोरे काळेभोर डोळे…करवंदासारखे असलेले अशी होती “दीक्षा”… तिला.. त्यांचे नवीन घर दाखवण्यास आणि तिला सोबत म्हणून अश्विनी नेच तिला बोलवून घेतले होते… दिक्षास पाहून अश्विनी ला खूप आनंद झाला.. अश्विनी ने दिक्षास पाहताच तिला जाऊन कडकडून मिठी मारली… तिच्या हातातील पर्स व sag घेऊन तिला आत आणले … “आत येताच दिक्षा ने अमित बद्दल विचारले ताई अग अमित कुठे गेलेत.. “ अग तू बस आधी मी तुला पाणी आणते अमित ऑफिस ला गेला आहे…येईल सायंकाळी .अश्विनी ने दिक्षा साठी पाणी आणले ..आणि तिला पाणी पाजत पाजत विचारू लागली. मग सांग कशी आहेस तू? आई कशी आहे..?.?… हो हो सांगते थांब जरा मला पाणी तर घेऊ देत..
अश्विनी ने दिक्षास पाणी दिले दीक्षा पाणी पिऊन तृप्त झाली आणि ती अश्विनी कडे वळली आणि म्हणाली “हम्म आता विचार काय विचारायचं ते …” अश्विनी बोलणार तेवढ्यात दीक्षा अश्विणीस थांबवत म्हणाली ..”हो हो अग ताई घरी सर्व जन ठीक आहेत आई बाबा मी आम्ही सगळे मजेत आहोत आणि तुझ आणि अमित जीजू च स्वतः: च घर म्हणल्यास तर बाबा जाम खुश झाले आहेत पहा ” अश्विनीच्या डोळ्यात पाणी आले ते पुसत पुसतच अश्विनीने अजून एकदा विचारले अग आपला आदित्य कसा आहे ? अश्विनीच्या त्या प्रश्नाने दिक्षाचा तो गोड चेहरा कोमेजला गेला अश्विनीने ते हेरले आणि म्हणाली..”काय ग काय झाल ? असा चेहरा का पाडलास ? आदित्यला काही ” .त्याला नाही मला ..मला एकटीला सोडून गेला तो …न सांगताच कोठेतरी दूर ?”. “म्हणजे!” अश्विनी म्हणाली दिक्षाने तिला मधेयचं अडवत म्हणाली ..जाउदे अश्या लोकांची आठवण देखील नसावी जाऊ दे गेला तर गेला मला माझी life आहे न जगायला मी आहे स्वतंत्र त्याच्या शिवाय …अश्विनी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली ..बर असुदेत मी नाही काही विचारत आता तू हि थकली असशील खूप चल तू फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी मस्त गरमा गरम कांदे पोहे बनवते तुझ्या आवडीचे ते पण जा होऊन ये फ्रेश असे म्हणत अश्विनी .. किचनच्या दिशेने निघाली…दिक्षाने आपली पर्स बाजूला ठेवली आणि फ्रेश होण्यास निघाली निघाली खरी पण तिला वाशरूम माहित नव्हते ..म्हणून ती किचन च्या दिशेने गेली .आत मध्ये अश्विनी काहीतरी चाकूने कापत होती . पण एका वेगळ्याच अंदाजाने ..आपली मान डाव्या बाजूस झुकवून कोथिंबीर कापण्यास लागणारा हलकासा वार देखील ती रागारागात करत होती..ख्प्ख्पख्प्ख्प….” तेवढ्यात दिक्षाने अश्विनीस हाक मारली आणि म्हणाली अग ताइ बाथरूम कोठे आहे? तसी अश्विनी थांबली ..आणि ती तसेच आपला चेहरा पुढे ठेवून म्हणाली ..”इथून थेट पुढ जा …समोर उजव्या बाजूस एक खोली आहे त्या खोलीच्या समोरच आहे ” दीक्षा थोड थांबून तीच बोलन ऐकत होती .. दीक्षाला जरासे वेगळे वाटले. पण ती तसीच निघाली तिच्याकड दुर्लक्ष करून… दीक्षा त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली… कि समोरून तिच्या पुढ्यात अश्विनी आली तिच्या हातात पोह्याचा डब्बा होता आणि ती तो खोलण्याचा प्रयत्न करीत होती.. दीक्षा अश्विनीस पाहून एका जागी थक्क झाली.. कारण तिने आताच अश्विनीस किचन मध्ये पाहिलं होत ..ती अश्विनी जवळ गेली आणि म्हणाली .. “ताई मी तुला आताच किचन मध्ये पाहिले तू कोथिंबीर कापत होतीस ” अश्विनी डब्बा खोल्ण्याच्याच प्रयत्नात होती तिचे बोलणे ऐकून ती तशीच थांबली आणि म्हणाली दीक्षा बाळा मी आत्ताच तुझ्या समोरून आले न बाहेर .मी किचन मध्ये कशी असेल ” काय तू इकडे होतीस अग नाही तू मला आताच बाथरूम चा रस्ता पण सांगितलास कि समोरील खोली जवळच बाथरूम आहे अश्विनी तिच्या त्या वाक्याने चकित झाली कारण ..आताच आलेल्या दिक्षास ५ मिनिट देखील झाली नसतील तिला बाथरूमचा मार्ग कसा कळाला .. दीक्षा पण अग मी तर इकडे “ अश्विनीस काही कळेना ती म्हणाली “चल आपण पाहूयात कोण आहे किचन मध्ये मी तर इकडे आणि किचन मध्ये चल कोणी चोर वगेरे तर नसेल न ” दोघी घाबरत घाबरत जाऊ लागल्या .. अश्विनीने हातात झाडू घेतला आणि दीक्षाच्या मागोमाग जाऊ लागली … आणि त्यांनी किचन चे दार ढकलले ……………………..
…..
आत कोणीच नव्हते .. अश्विनी जरासी हसली अग कोणीच तर नाहीये तुला न बाळ थकवा आला आहे इतका लांबचा प्रवास केला आहेस तू जा आणि फ्रेश हो .. दीक्षा ठीक आहे म्हणत बाथरूम कडे गेली आणि अश्विनी पोह्याच्या तैयारीस लागली .. दीक्षा एक paranormal गोष्टीची शोधकर्ता होती..तिने बरेच अश्या गोष्टींवर आपले लेख लिहले होते .. तीला एखाद्या ठिकाणी असणाऱ्या नकारात्मक गोष्टी भाकीत होत होत्या .. दीक्षा बाथरूम कडे निघाली.. कि जात जात तिला बाजूच्या खोलीत पलंगावर कोणीतरी विचित्र रीतीन् बसून तीला पाहत होत.. ते दिक्षास तेव्हा दिसले नाही ..पण जेव्हा तिने बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा …….
……
.. . बाथरूमच्या आरश्यात तिला ते दिसले … चेहरा पूर्ण जणू पांढराशुभ …केस एकदम विंचरून आंबाडा बांधलेला ..ओठावर लालभडक लाली ..मोठे काळे भोर डोळे आणि त्यात ठासून भरलेलं काजळ .. अंगात काळी साडी ..जे दिक्षास पाहत होत ते तिला दिसले दीक्षा च्या पायाखालील जमीन सरकली तिच्या हृदयात धस्स झाले .. कारण तिने आता पर्यंत ज्या गोष्टींवर लेख लिहले इतकी रिसर्च केली .ते अक्षरश: तिच्या डोळ्या समोर होत.. दीक्षा ते पाहतच राहिली तिला काही कळेना कि अचानक बाथरूमचा दरवाजा आतून लॉक झाला ..दीक्षा समजून चुकली ..आपण याचा प्रतिकार केला तर ते अजून आपणास हानी पोहचवण्याचा प्रयत्न करेल …म्हणून दीक्षा शांतपणे विचार करू लागली .. तिला माहित होते अश्या क्षणी काय करायचे तीझ मन आधीपासून जीवनातील मोठमोठ्या दुख:ना सहन करून भक्कम दगड सारखे झाले होते .. कि अचानक बाथरूम मध्ये तिला दुसर कोणीतरी असल्याचा भास झाला ..पण तो भास नव्हता ते सत्य होत.. तिच्या बाजूने एक काळसर भुरकट प्रतिकृती ..फिरताना तिला दिसू लागली .. पण त्या गोष्टीस ..दीक्षा चे प्राण नाही तर दीक्षाच्या शरीरात प्रवेश हवा होता .. दीक्षाने आपले मन सकारत्मक ठेवले ते प्रेत आणखीनच प्रयत्न करू लागले .. तेव्हा मात्र दीक्षाच्या समोर ती प्रतिकृती हरली आणि दहाड करत आरश्यामध्ये सामावली ..दिक्षाने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि तात्काळ खाली आली.. खाली येतच ती किचन मध्ये गेली… आत घुसताच तिच्या नाकात घमघमीत पोह्याचा गरम वास घुमला… अश्विनीने पोहे तैयार केले होते..त्यावरती नेबारीक चिरलेली कोथिंबीर ,,,…कुरकुरीत शेव … त्याव्र्र बारीक चिरलेला कांदा ..आणि बाजूला एक गोल अशी लिंबाची चकती… दीक्षा ते पाहून जे बोलण्यास आली होती ते विसरूनच गेली.. अश्विनीने तिच्या तोंडात चमचा भरून गरम पोहे घातले ,… कि दिक्षाने आपले डोळे झाकले …ती सगळ विसरून गेली ”आई ग!!! ताई …तुझे पोहे ..म्हणजे ना …वाह खूपच छान दे न ती प्लेट मला ” हो हो घे अग तुझ्या साठीच आहेत हे ..धर !! चल हॉल मध्ये बसून खावूयात..त्या दोघी हॉल मध्ये गेल्या ..दीक्षा तिच्या ताई च्या बनवलेल्या पोह्यावर ताव मारू लागली .. पण लगेच ते दृष्य देखील तिच्या लक्षात आल .. तिने न राहवून विचारले …”ताई या आधी या घराचा मालक कोण होता ” अश्विनी तिच्या त्या प्रश्नाने जरा गंभीर भावात म्हणाली काय दीक्षा पुन्हा तेच अग या घरात तसे काही नसणार बाळा …आम्ही घेण्यापूर्वी अमित च्या कंपनीकडून पूर्ण याची हिस्ट्री जोग्राफी जाणून घेतली काही काळजी नकोस ग करू..तुझा प्रोफेशन न जिथ एखाद मोकळ घर असेल तिथच भूत असणारच अस थोडी असते..” हम्म तू म्हणतेयस तर ठीक आहे ..पण मगा .. नाही काही नाही जाउदे ..मी tv पाहते तो पर्यंत हा हो पहा अश्विनी दोघींच्या पोह्यांच्या प्लेट्स उचलत होकार देत जाऊ लागली ..आणि किचन मध्ये गेली दीक्षाने tv सुरु केला पण tv ला सर्व मुंग्या आल्या होत्या … दीक्षा channnel पलटून पलटून पाहत होती काही लागेना.. तिने अश्विणीस हाक मारणार तेवढ्यात एक channel चालू झाला त्यावर काही नाव नव्हते पण एक बातमी दाखवत होते..कि एका घरातील कुटुंबांचा त्यांच्याच घरातील वडिलाने आपल्या मुलीस आणि स्वताच्या पत्नीस कुऱ्हाडीने घाव घालून जीव मारले आणि स्वतः घरातील हॉल मध्ये लटकून आत्महत्या करून घेतली .. दीक्षा ने chaannel चेंज केला ..पुन्हा तीच बातमी पुन्हा चेंज केला पुन्हा तीच बातमी ..पुन्हा चेंज पुन्हा तीच बातमी दीक्षाने अश्विनी हाक मारली अग ताई ऐक ना असे म्हणत ती उठली आनि अश्विनी कडे गेली….ती ऐक न अग tv ला एकच chaannel आहे दुसर काही दाखवतच नाहीये तेव्हा अश्विनी दीक्षा कडे वळली आणि म्हणाली अग tv ला अजून कनेक्शन पण नाही जोडलं तर tv कसा चालू होईल आज केबल वाला येणार होता तो हि नाही आला मग तू tv कुठून पाह्तेयस.. दीक्षा ला कळून चुकले कि कोणीतरी नक्की आहे इथ जे हे सगळ घडवून आणतय याला काय कराव तिला सूचेना म्हणून न काही बोलताच ती रूम मध्ये गेली आणि आराम करू लागली इकडे अश्विनीकिचन मध्ये होती ति कामात गुंग झाली होती..कि अचानक टिळा वाटले तिच्या बाजूला किचनच्या कोपरयात कोणीतरी उभ आहे त्या भागात काळोख वाटत होता ..कि अचानक तिला कोणाच्या तरी गुर्गुण्याचा आवाज येऊ लागला .. “ह्र्हर्ह्हग्ग्गग्र्र्र ” … अश्विनीस वाटले असेल काही तरी …पण ते काहीतरी नव्हते … पुन्हा तोच आवाज “ह्र्हर्ह्हग्ग्गग्र्र्र या वेळी मोठा आणि स्पष्ट अश्विनी मागे वळली कि एका क्षणातच मागे त्या अंधारातून एक काळी साउली बाहेर आली जिचे तीक्ष्ण दाते आणि लाल डोळे ते थेट अश्विनी च्या अंगावर धावले कि अश्विनी जोरदार किंचाळली आणि तेव्हाच तिथ दीक्षा आली कारण तिला भाकीत झाले होते कि असे काही होणार दीक्षा येताच ती गोष्ट नाहीसी झाली दीक्षा नी अश्विनीस देवघरात पाठवले … आणि किचन मध्ये मेणबत्ती हुडकण्यास सुरुवात केली ,,,,… कसी बसी धडपड करून दीक्षा ला मेणबत्ती सापडली आणि तिने ती पेटवली… सर्व दारे खिडक्या तिने तत्पूर्वी बंदच करून घेतल्या होत्या… दीक्षा हातातील पेटलेल्या मेंबात्तीकडे एकट्क पाहून काही तरी पुटपुटू लागली…..ती हळू हळू किचनच्या प्रत्येक एका कोपऱ्यात जाऊ लागली आणि जशी ती किचन च्या दारा मागील अंधारात पोहोचली कि पोहचता क्षणी .. मेणबत्ती मधून काळभोर असा धूर निघायला सुरुवात झाली मेणबत्ती वेगा वेगा ने जाळू लागली… मेन हळू हळू ओघळत दीक्षाच्या हातावर येऊ लागले दीक्षाला चटके बसत होते ,,तरी हि तिने मेणबत्ती सोडली नाही समोरील त्या अंधारात कोणीतरी त्या मेंबात्तीमुळे तडफडतय अस वाटत होत .. आणि ते अचानक रागाच्या भरात निघून त्या अंधारातून थेट दीक्षाच्या अंगावर धावले ….ते जसे दीक्षाच्या अंगावर धावले कि दीक्षा आपली सर्व ताकत एकटवून ..त्या प्रेताकडे बोट करत ओरडली ….”थांब ….तेथेच ..एक पाउल हि पुढ टाकलस तर जाळून खाक करीन तुला ..” त्या समोरील काळ्या प्रतिकृतीस पाहून दीक्षाचे डोळे मोठे झाले होते… ती भयंकर गोष्ट जणू दिक्षाच्या जीवावर उठली होती…
त्याच्या तोंडून रागाने गरम फुत्कार बाहेर पडत होते …”हःस्स्स्सस्स्स्सह्ह्हह्ह्हह्ह्हह्ह्हह्ह्ह स्स्स्सह्ह्हह्ह्हह्ह्हस्स्सह्ह्हह्ह्ह ”
दीक्षा बोलू लागली ,,…. “कोण आहेस तू ? काय हवय तुला ” … ती समोरील गोष्ट आपल्या रागाच्या भरात दीक्षाच्या आणखीन जवळ आली.. दीक्षा भक्कम हृदयाची होती.. तिने जीवनात बरेच दु:ख पाहिलं होत.. म्हणून तीच हृद्य हि जणू दगडाचे बनले होते… इ गोष्ट तिच्या चेहऱ्या जवळ आली आणि एका अनोळखी भाषेत बडबडू लागली “हे मंझ घराय…हे मंझ घराय … तुन्जा नाय तुन्जा नाय …तुम्जे मार्जी मे निग्जा निग्जा ” दिक्षास ती भाषा जणू नवी होती… पण त्या प्रेतात्म्याचे भाव ती ओळखू शकत होती … ते प्रेत मोडी भाषेत बडबडत तेथून गायब झाले… दीक्षा नाही समजू शकली त्याला.. तिला फक्त एवढेच समजले कि त्याला आम्हा सगळ्याच इथ येन आवडल नाही.. आणि त्याचा दुसरा काहीतरी हेतू होता … दीक्षाच्या हातावर ते सगळे मेन पाघळून तिचा हात लाल झाला होता … ती बेसिन मध्ये गेली आंनी तिने तेथे आपला हात धुतला…आणि त्यावर मलम लावला … ती दाराकडे वळाली तर दारात अश्विनी उभी होती…. ती थरथरत उभी होती. तिला कळेना झाले काय म्हणावे …
तिने हळू हळू आपला हात वर उचलला …तिचे ओठ बोलताना थरथरत होते… दीक्षा तिच्या जवळ गेली… आणि तिचा हात पक


This post first appeared on Marathi Bendhund Stories, please read the originial post: here

Share the post

Marathi Horror Story गहिरा अंधार

×

Subscribe to Marathi Bendhund Stories

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×