Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पुण्यातील काकासाहेब गाडगीळ पूल किंवा झेड ब्रिज येथील 'राधेचा पुतळा'

पुणे शहरामध्ये जश्या ऐतिहासिक गोष्टी पहायला मिळतात तसेच शहरातील काही पुतळ्यांना देखील महत्वाचे स्थान मिळालेले आहे. अश्या पुतळ्यांच्या पैकीच एक महत्वाचा पुतळा हा पुणे शहरातील काकासाहेब गाडगीळ पूल किंवा झेड ब्रिज येथे असलेल्या पुतळ्याला देखील अशीच काही पार्श्वभूमी लाभलेली आपल्याल दिसते. काकासाहेब गाडगीळ किंवा झेड ब्रिज येथे असलेला पुतळा हा 'राधेचा पुतळा' म्हणून ओळखला जातो. अश्या या 'राधा' नावाच्या स्त्रीच्या पुतळ्याची पार्श्वभूमी काय आहे हे नक्कीच समजून घेण्यासारखे आहे.


६० ते ७० दशकामध्ये पुणेकरांचे आकर्षण असलेला एका स्त्रीचा पुतळा पुण्याच्या लकडी पुलाच्या टिळक चौकामध्ये मोठ्या दिमाखात उभा होता. या पुतळ्याचे काही छायाचित्रे तत्कालीन वर्तमानपत्रे आणि मराठी पिक्चर मध्ये देखील पहावयास मिळतात. कमरेवर पाण्याने भरलेली घागर घेतलेल्या कमनीय बांधा असलेल्या आणि ओल्या वस्त्रातील हा स्त्रीचा(राधा) पुतळा हा टिळक चौकातील मध्यवर्ती वाहतूक बेटामध्ये उभारलेला होता. जवळपास २५ ते ३० वर्षे हा पुतळा टिळक चौकामध्ये उभा होता.


६० ते ७० दशकामध्ये पुणेकरांचे आकर्षण असलेला एका स्त्रीचा म्हणजेच 'राधेचा पुतळा'


तसेच ६० ते ७० च्या दशकामध्ये संथगती वाहतुकीला शिस्त आणि वळण लावण्याचे काम या स्त्रीच्या पुतळ्याने केलेले होते. नंतरच्या काळामध्ये जशी पुणे शहरातील वाहने वाढली त्याच्यानंतर मोठी वाहने वळवताना त्रास होऊ लागला आणि नंतरच्या काळामध्ये हा टिळक चौकामध्ये असलेला स्त्रीचा पुतळा हलवला गेला. जेव्हा हा स्त्रीचा(राधा) पुतळा टिळक चौकातून हलवला गेला तेव्हा त्याकाळात हा पुतळा हलवताना तत्कालीन पुणेकरांनी मोठा विरोध केला होता असे उल्लेख सापडतात. तसेच हा स्त्रीचा पुतळा हलविल्याचे पडसाद हे तत्कालीन वर्तमान पत्रांच्या वाचकांच्या व्यवहारामध्ये देखील छापुन आले होते. 


नंतर हा स्त्रीचा पुतळा कधी या चौकात तर कधी त्या चौकात अश्या पद्धतीमध्ये फिरत होता आणि जवळपास १५ वर्षे हालअपेष्टा झाल्यानंतर या स्त्रीच्या(राधा) पुतळ्याचे नशीब मात्र उजळले ते थेट २००२ साली. पुण्यामध्ये जेव्हा गाडगीळ पूल किंवा झेड ब्रिज बांधला गेला तेव्हा या पुलाच्या कोपऱ्यावर या स्त्रीच्या पुतळ्याला व्यवस्थित जागा मिळाली. सध्या 'यशवंत दत्त स्मृतीशिल्प' या रूपाने पाण्याच्या चादरीपुढे पुन्हा कमरेवर असलेल्या घागरीमधून सतत पाणी सांडणारी टिळक चौकातील स्त्री(राधा) सध्या काकासाहेब गाडगीळ पुलाच्या एका कोपऱ्यावर स्थानापन्न झालेली आहे. अश्या सुंदर स्त्री(राधा) शिल्पाचा इतिहास पुणेकरांच्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे याचे कारण म्हणजे एकेकाळी पुणे शहराची शान असलेले हे स्त्रीचे शिल्प आणि त्याच्याबद्दल केलेला विरोध मात्र सध्याच्या पुणेकरांना नक्कीच माहिती नाही. अश्या या स्त्री(राधा) पुतळ्याचे नाव 'राधा' कधी पडले किंवा कोणी दिले हे मात्र समजत नाही.


या स्त्री(राधा) पुतळ्याचे नाव 'राधा' कधी पडले किंवा कोणी दिले हे मात्र समजत नाही.

असा पुणे शहराची शान असलेला 'राधेचा पुतळा' नक्कीच पुणे शहराचा वारसा आहे. पुणे शहराचा हा वारसा जर आपल्याला पहायचा असेल तर काकासाहेब गाडगीळ पूल म्हणजेच पुणेकरांचा लाडका 'झेड ब्रिज' येथे एकेकाळी पुणेकरांची आकर्षण ठरलेली  हि 'राधा' आपली वाट पाहत उभी आहे.   

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) मुठेकाठचे पुणे:- प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २०१५.  

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


 लिखाण आणि छायाचित्रे © २०२१ महाराष्ट्राची शोधयात्रा         

Share the post

पुण्यातील काकासाहेब गाडगीळ पूल किंवा झेड ब्रिज येथील 'राधेचा पुतळा'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×