Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

किती !

जीवना ही तुझी कमाल किती ? श्वास झाले तुझे सवाल किती ! दूर होतो अडून मी उरलो पावले सांगतात हाल किती ? मीच ज्यांची मिजास चालवली तेच मारेकरी खुशाल किती ! हाय, धोंडे जिथे तिथे सजले देव झालेत ते विशाल किती ! जे नको तेच सारखे जगलो बांधले यातना महाल किती ! मीच जाईन सोडुनी दुनिया मीच होऊ अता मशाल किती ? जिंकलो आज मी जरी असलो वादळे वागली विजाळ किती ?This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

किती !

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×