Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

criminal burn shop: सांगलीत पुन्हा गुंडांची दहशत; दुकान जाळले, वाहनांची तोडफोड – criminal burn shop and breaks vehicles in sangli


म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगलीतील १०० फुटी रोड परिसरात पुन्हा गुंडांनी दुकानाची जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवली. हा प्रकार शनिवारी (ता. ४) पहाटेच्या सुमारास घडला. हल्लेखोर दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याबाबत मंडप डेकोरेटर्स बाळासाहेब कुदळे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब कुदळे हे सांगलीतील नामांकित मंडप डेकोरेटर्स आहेत. १०० फुटी रोडवरील पाकिजा मशिद शेजारी त्यांचे कुदळे डेकोरेटर्स हे दुकान आहे. दुकानापासून काही अंतरावर त्यांचे घर आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांना दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाली. तातडीने अग्निशामक दलास बोलवून त्यांनी दोन्ही मुलांसह आग विझवण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील महागडे सोफा सेट, लग्न समारंभात वधू-वरांना लागणाऱ्या खुर्च्या, मॅटिंग, मंडपाचे कापड, पडदे यासह अन्य साहित्य जळून खाक झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असे कुदळे यांना वाटले होते. मात्र, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चार ते पाच जणांनी दुकानाची आणि वाहनांची तोडफोड करून आग लावल्याचे स्पष्ट झाले.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग आणि सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. कुदळे यांनी चौघांवर संशय व्यक्त करीत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा १०० फुटी रोड परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात वारंवार गुंडांकडून वाहनांची तोडफोड आणि मारहाण करून दहशत माजवली जात असल्याने पोलिसांनी गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.Source linkThis post first appeared on Breaking News, India News, Sports News And Live Updates, please read the originial post: here

Share the post

criminal burn shop: सांगलीत पुन्हा गुंडांची दहशत; दुकान जाळले, वाहनांची तोडफोड – criminal burn shop and breaks vehicles in sangli

×

Subscribe to Breaking News, India News, Sports News And Live Updates

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×