Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पुणे स्टेशन

रात्रीचे अकरा वाजले होते,

रेल्वे पुणेस्टेशनवरून मुंबईला सुटण्याच्या तयारीत होती.

बसायला जागा नव्हती.

हे पाहून मन्याने शिंकायला सुरवात केली.

सारे प्रवासी घाबरून आपापले सामान घेऊन आजूबाजूच्या बोगीत निघून गेले.

मन्या मनोमन खुश झाला

आणि त्याने एका रिकाम्या जागेवर आपला बिस्तरा पसरला आणि आडवा झाला.

दिवसभरात शिणल्यामुळे तो ताबडतोब झोपी गेला.
सकाळ झाली,

चायवाल्याच्या आवाजाने तो जागा झाला.

गाडी स्टेशनवर थांबली होती.

तो उठून गाडी बाहेर आला आणि चहावाल्याला विचारलं, कोणतं स्टेशन आलं आहे?

चहावाला: पुणे.

मन्या: अरे रात्री तर गाडी पुण्याहून सुटली होती.

चहावाला: रात्री कोणीतरी कोरोनाचा पेशंट गाडीत चढला होता. त्यामुळे ही बोगी बाजूला ठेवून बाकी गाडी निघून गेली!!!!!

Share the post

पुणे स्टेशन

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×