Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

श्लोक

बंड्याने संस्कृत च्या गुरुजींना विचारले,
 गुरुजी,
येन रूक नपाम्रधु।

येन रूक नपाद्यम॥
या श्लोकाचा अर्थ काय हो  ??
गुरुजींनी अनेक ग्रंथांमध्ये हा श्लोक शोधला. 
अनेक संस्कृतच्या पंडीताना विचारलं.  
भरपूर मेहनत घेतली.  जंग जंग पछाडले,  
पण कुठेच काही शोध लागला नाही.
४ – ५  दिवसांनी गुरुजींनी बंड्यालाच विचारले,
“बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ?
बंड्या गुरुजींना म्हणाला – 
“हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी…” 
गुरुजी बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले. 
तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवले, 
गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला..
बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता. 
तिथं लिहीलं होतं
धूम्रपान करू नये।

मद्यपान करू नये॥


Filed under: Uncategorized

Share the post

श्लोक

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×