Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

NMMS मधील गुणवंतांचा सत्कार

SIHORA SPECIAL NEWS





सिहोरा :-  युगांधर युवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ,सिहोरा च्या राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र द्वारा संचालित युगांधर मिशन ऑफिसच्या स्पर्धा केंद्राच्या 17 गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थीनीनी सन 2021 - 2022  मध्ये Nmms ही स्पर्धा परीक्षा पास करून ते 48 हजार रुपये शिष्यवृत्ती चे मानकरी ठरले आहे.  तर 15 विद्यार्थी, विद्यार्थींनी 2022 -2023 च्या परिक्षेत पास होऊन ते 60000/- रुपये शिष्यवृत्ती चे मानकरी ठरले आहेत.  अशा  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि 2022 - 2023 च्या केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा  उत्तीर्ण (UPSC) होऊन देशात 581 स्थान पटकावून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा गौरव वाढविणारा सुपुत्र श्री.अमित उंदिरवाडे यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक जिल्हा पोलिस अधीक्षक श्री लोहीत मतानी साहेब यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.


     मिशन ऑफिसच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना श्री मतानी साहेब यांनी स्वतः UPSC स्पर्धा परीक्षा कशी पास केली याचे अनेक दाखले देत, विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी गुरुमंत्र दिला.   कोणतीही स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी, ग्रामीण आणि शहरी,  इंग्रजी आणि मराठी अशी कोणतीही  दुभाजक किंवा  भेदभाव यात नसतो.  असतो तो फक्त व फक्त आपल्याच मनातील न्युनगंड असतो.   कठिण परिश्रम, जिद्द आणि चिकाटी हीच यशाची खरी चाबी आहे. 




      मी सुद्धा 500 लोकवस्ती असलेल्या एका छोट्या गावात शिक्षण घेऊन आज हा शिखर गाठलो  आहे.  आपल्या अनुभवाच्या माध्यमातून  श्री. अमित उंदिरवाडे यांनी देखील  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युगांधर समुहाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश सहारे गुरुजी यांनी तर संस्थेचे अध्यक्ष विनोद तुरकर यांनी सर्व अतिथी आणि उपस्थितांचे आभार मानले.


Your Advertising Here

Call us on 9373388623

एक बार लगाओ, बार बार कमाओ

कम मे बम


संपादक चंद्रशेखर भोयर








This post first appeared on Progress, please read the originial post: here

Share the post

NMMS मधील गुणवंतांचा सत्कार

×

Subscribe to Progress

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×