Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Sabudana Bhel - साबुदाणा भेळ

लागणारा वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी : ४ - ५
Read Sabudana Bhel In English
साहित्य : 
  •  १ कप साबुदाणा 
  •  २ मध्यम बटाटे 
  • लाल तिखट, चवीनुसार 
  • २ चमचे शेंगदाणे 
  • २ चमचे काजू 
  • ३ चमचे तेल 
  • लिंबू रस 
  • मीठ, चवीनुसार 
  • कोथिंबीर 
  • १ चमचा गरम मसाला 
  • १/४ कप बटाटा शेव 
कृती :
१. साबुदाणे पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या. पाणी नीट काढून टाका. रात्रभर साबुदाणे भिजत ठेवा. (साबुदाणा खिचडी करता करतो तसे करावे)
२. बटाट्याची साले काढून, पातळ काप करा. 
३. कढईत शेंगदाणे भाजून घ्या. बाजूला काढून ठेवा. त्याच कढईत काजू भाजून घ्या. बाजूला ठेवा. 
४. कढईत तेल गरम करा. कापलेले बटाटे तळून घ्या. बाजूला काढून ठेवा. 
५. त्याच कढईत तेल गरम करत ठेवा. तेल तापले कि साबुदाणे टाकून हलवत रहा. 
६. साबुदाणा पूर्ण शिजेपर्यंत नीट हलवत रहा. 
७. साबुदाणा शिजला कि त्यात कोथिंबीर, तळलेले काजू, शेंगदाणे, मीठ, तिखट, बटाट्याचे काप टाकून नीट एकजीव करा. 
७. एका प्लेट मध्ये हि तयार भेळ काढून वरून कोथिंबीर आणि बटाटा शेव टाकून खायला द्या. 

जर तुम्हाला थोडीशी गोड चव हवी असेल, तर भेळेत साखर टाका. 


This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Sabudana Bhel - साबुदाणा भेळ

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×