Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वाक्षरी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

 कवितेचा उत्सव 

☆ स्वाक्षरी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(पादाकुलक)

तुझ्यातले ते झपाटलेले

शमू दे वेड्या सुसाट वादळ

तू आता हो नि:शब्द सळसळ !

घनव्याकुळ ना उरले कोणी

कोणास्तव हे दाटुन येणे

टपटप झरणे प्राण उधळणे ?

अपार होते परंतु मिथ्या

त्या गगनाने दिधले पंख

त्या गगनाचा जन्मा डंख !

कितिदा त्यांनी बळी घेतला

तरी क्रूस हा तुजला प्यारा

तुझ्या जगाचा न्यायच न्यारा !

कुठवर लढशिल रण एकाकी

पत्कर तूही दुनियादारी

आणि तहावर करी स्वाक्षरी !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वाक्षरी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.

Share the post

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वाक्षरी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

×

Subscribe to ई-अभिव्यक्ति - साहित्य एवं कला विमर्श (हिन्दी/मराठी/अङ्ग्रेज़ी)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×