श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
मनं पाखरू ! श्री प्रमोद वामन वर्तक
मनं पाखरू पाखरू
Related Articles
परी हलके पिसागत,
जाई साता सुमद्रापार
क्षणी बेभान वेगात !
मनं पाखरू पाखरू
सारा सयीचा खजिना,
इथे दुःखी जखमांना
कधी जागाच पुरेना !
मनं पाखरू पाखरू
घर बांधे ना फांदीवर,
नेहमी शोधित फिरे
वृक्ष साजिरा डेरेदार !
मनं पाखरू पाखरू
पंख याचे भले मोठे,
दृष्टीआडचे सुद्धा
कवेत क्षणात साठे !
मनं पाखरू पाखरू
वारा प्यालेले वासरू,
बसे ना कधी वेसण
सांगा कसे आवरू ?
© श्री प्रमोद वामन वर्तक
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
The post मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ appeared first on साहित्य एवं कला विमर्श.
This post first appeared on ई-अà¤à¤¿à¤µà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿ - साहितà¥à¤¯ à¤à¤µà¤‚ कला विमरà¥à¤¶ (हिनà¥à¤¦à¥€/मराठी/अङà¥à¤—à¥à¤°à¥‡à¥›à¥€), please read the originial post: here