Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

झुकल्या वाकल्या माना या शिवमंदिरी!

#मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर    #मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे भेट   #CM to meet shivsena chief Uddhav Thackeray

शिवसैनिकांना पुन्हा एकदा भाजपची खिल्ली उडवण्याची संधि मिळाली आहे. ती संधी खुद्द मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीच दिली आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजप यांची पोस्टर, जाळपोळ आणि शब्दांची लढाई सुरू होती. दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना तिरस्काराने बघू लागले होते. मग मंत्रिमंडळ विस्तार झाला. तेथेही बर्‍याच अफवांचं पीक आलं. उद्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्नेहभोजन घेणार आहेत.

शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे सत्तेत राहूनही भाजपला टार्गेट करण्याची संधी सोडत नाही. सातत्याने शिवसेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे. सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. विरोधक अधिक आक्रमक झालेले दिसत आहेत. अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. तर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधक आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही भेट असू शकते, अशी राजकीय चर्चा आहे.

येणार्‍या अधिवेशनाच्या तोंडावरच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. सुरूवातीला शिवसेनेला काहीच मिळणार नाही, सेनेची बोळवण वगैरे बातम्या देऊन माध्यमे मोकळी झाली पण मुख्यमंत्र्यांनी सेनेला ‘सांभाळून’ घेतलं होतं. सेनेला हवं असलेलं गृह खातं (राज्यमंत्री) दिलं, शिवाय नंतर दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्याकडे अतिरिक्त खात्यांचा भारही दिला. यातून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला न दुखवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतं. मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बाधून तयार होते पण मुख्यमंत्र्यांनी अखेर स्वतःचा निर्णय घेत मर्जीतल्या लोकांनाच मंत्रिमंडळात सामावून घेतलं. त्यात ‘बाहेरून’ आयात केलेल्या लोकांचा चांगलाच हिरमोड झाला. शिवाय पक्षातील ‘निष्ठावान’ व जुने कार्यकर्तेही चांगलेच दुरावले गेले. शिवाय पंकजा मुंडे, विनोद तावडे हेही नाराज असल्याचं जगजाहीर आहे. त्यात खडसे ‘शांत’ आहेत की नाही याचीही खात्री नाही. हे सगळं कमी होतं की काय म्हणून मंत्रिमंडळतील बर्‍याच मंत्र्यांवर भ्रष्टाचार व इतर आरोप होऊ लागले. भर पडली ती #कर्जत मधील बलात्कार प्रकरण!!! हे सगळं काही भाजपाच्या हिताचं नाही हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं. येणार्‍या अधिवेशनात विरोधक तर आक्रमक असणारच होते पण स्वपक्षातून कोंडी होण्याची जास्त शक्यता होती. मुख्यमंत्र्यांची मोठी अडचण होणार यात शंका नव्हती. पण मुख्य अडचण वेगळीच. अलीकडेच भाजपच्या प्रवक्ते आणि नैतिकता महामेरू नेत्यांनी थेट ‘मातोश्री’ वर हल्ला चढवला होता आणि ‘आमच्याकडे बहुमत आहे आम्हाला शिवसेनेची गरज नाही’ अशा गर्जना केल्या होत्या. आधीच सगळीकडून कोंडी होत असताना लक्षात आल्याने शेवटी आपल्या ‘मित्राकडे’ मदत मागायचा विचार केलेला दिसतो. एरवी ‘मातोश्री’ वर जाण्यासाठि अहंकार कुरवाळत बसणार्‍या भाजप नेत्यांना पुन्हा त्याच ‘मातोश्री’ चे उंबरठे झिजवावे लागत आहेत. येत्या अधिवेशनात शिवसेना सगळे हिशोब चुकते करायच्या विचारात असेल तर सरकार आणि त्याहीपेक्षा फडणवीस यांची खुर्ची डळमळीत होऊ शकली असती. विरोधक, स्वपक्षीय आणि मित्रपक्ष जर एकत्र आले तर अधिवेशनात पुरता बाजा वाजणार हे मुख्यमंत्र्यांच्या ध्यानी आलं असावं. पक्षात आणि विरोधकांत शब्दाला किती किम्मत मिळेल याची शास्वती नसल्याने त्यांना पुन्हा शिवसेनेकडे मदतीची विनंती करावी लागत आहे. आता भाजप प्रवक्ते अन नैतिकता महामेरू यांना ‘#कंत्राटदारांचे साथीदार’ किंवा ‘#शोले मधील #जेलर #अश्राणी’ कुठे दिसतात का ते विचारावे लागेल. हा मुद्दा भाजपला महाग पडू शकतो हे नक्की!!!

मध्यंतरीच्या काळात शिवसैनिकांनी एक घोषणा काढली होती त्याचा पुरेपूर प्रत्यय आता येतो आहे… @झुकल्या वाकल्या माना या शिवमंदिरी!

See Links

http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/chief-minister-devendra-fadnavis-uddhav-thackeray-meeting/321378

CM Fadanvis at Matoshree for Dinner

© 2016, Late Night Edition. All rights reserved.This post first appeared on Late Night Edition, please read the originial post: here

Share the post

झुकल्या वाकल्या माना या शिवमंदिरी!

×

Subscribe to Late Night Edition

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×