Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

कॉफी विथ काकू


बाबांनी इहलोकाची यात्रा संपवल्यानंतर त्यांची व त्यांच्या कार्याची ओळख समविचारी अनोळखींना व्हावी या साठी मी जमेल तसे प्रयत्न करीत आलो आहे. ते माझे कर्तव्यच आहे, त्यात काहीच जगावेगळे नाही पण बाबांच्या 'एकला चालो रे' जीवनातून प्रेरणा घेण्यासारखे मात्र बरेच काही आहे, ते सर्व इच्छूकांना कळावे एवढा एकच हेतू या धडपडीमागे असतो.

२०१६ चा मे महिना होता. बाबांना जाऊन जेमतेम सहा महिने झाले असतील. बाबांना प्रिय असलेला तठस्थपणा बाळगून मी आपल्या कामात मग्न होतो - मन प्रसन्न होते, उद्विग्न होण्यासारखे कोणतेच विचार सतावत नव्हते का जुन्या आठवणी दाटून आल्या नव्हत्या. आभाळ काळोखून आले नसताना जणू वीज पडावी तशी बाबांकडची मंडळी कशी होती, कशी आहेत हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा आपोआप प्रकट झाली. असे काही करण्याची इच्छा आधी कधीच झाली नव्हती. मात्र आकाशवाणी समजून मी  मनात आले ते प्रत्यक्षात साकार करण्याचे ठरविले. 

रक्ताचे नाते असलेल्या काही अति विशिष्ट, जगजेत्या तज्ञ मंडळींशी माझे संबंध अतिविशेष असल्याने माझ्या या पादचारी सोहळ्याला त्यांची उपस्थिती नव्हती हे सर्वार्थाने योग्य झाले म्हणायचे, उगीच त्यांच्या गुळगुळीत,चकाकत ठेवलेल्या सामाजिक प्रतिष्ठेला तडा गेला असता, आणि वर त्यांच्या त्या जीवघेण्या सुस्काऱ्यांचा आणि तिरस्कार-रसाने बरबटलेल्या कटाक्षांचा - शब्दांच्या आणि सुरांच्या पलीकडला असा - आघात भेट म्हणून सहन करावा लागला असता.    

त्यामुळे मनात आले तसे शक्य झाले तेवढ्या लोकांना तडक आमंत्रण दिले. कार्यक्रमाचा हेतू मुळातच उद्दात होता. निर्मळ भेटी घडतील, सुख दुःखाच्या चार गोष्टी होतील, सर्वांची खुशाली कळू शकेल अशा प्रकारचे वातावरण निर्माण करायचे असे मी मनोमन ठरवले होते. कार्यक्रमाचा सर्व खर्च आपणच करायचा, कोणाकडेही मदतीसाठी याचना करायची नाही हे माझ्या स्वभावाला अनुसरूनच असल्यामुळे या खर्चाला भार मानण्याचा प्रश्नच नव्हता.  

आपल्याकडील माणसांच्या (आणि त्यांच्या मुलांच्याही) नसानसात उग्र स्वरूपाचे राजकारण भिनलेले असते ही साधी गोष्ट मी विसरलो नसलो तरी तात्पुरती बाजूला सारली होती, मनातल्या 'आकाशवाणीचे' ओळखीच्या लोकांच्या  'दूरदर्शनाशी' सांगड घालता येऊ शकत नाही याची मला कल्पना होती तरीही मी हे धाडस केले. त्याचा व्हायचा तो परमाणु परिणाम होणार याची खात्री नव्हती पण कल्पना नक्कीच होती. त्या विस्फोटाची नोंद घेण्याआधी काही जणांचे मनापासून आभार मानायचे आहेत ज्यांनी या कार्यक्रमाच्या हेतूला ओळखून त्याला साजेशी


This post first appeared on The Lost Accountant, please read the originial post: here

Share the post

कॉफी विथ काकू

×

Subscribe to The Lost Accountant

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×