Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

देखो_माही_मार_रहा_हैं

" रेल्वे टीम साठी खेळताना पहिली बॅट ही मित्राने स्वताच्या पैशातून विकत घेत मला दिली होती..." आणि एक जगजेत्त पर्व आता सुरु होणार होत... पण खर आभार तर आपण त्या बनर्जी सरांचे मानायला हवेत. जाळीच्या पुढं चड्डी घालून उभ राहणाऱ्या पोराला त्याने तीन लाकड़ा माग उभ केलं आणि त्याने आज तिरंगा आख्या जगात डौलाने फडकवला...

डिसेंबर २००४, मीरपुर- बांग्लादेश..  हातात धोपाटनच जणू,५२ इंच छाती, लाल लांबसडक केस, चालण तर अगदी कसलेल्या मातीतल्या पहिलवाना सारख.. पण पहिल्याच चेंडूवर शून्यात धावबाद... रुको भाई हर झिरो की भी एक कहानी होती है... क्योंकि आता याचे तडाखे सुरु होणार होते..

पाकिस्तान -पेशावर..१४८ धावा.. अर्र्रर त्या राणा नावेदला ३ लागोपाठ षटकार ठोकून त्याची केस आणि career दोन्ही बरबाद केलीस... आणि तिथून परवेज़ मुशर्रफ तुझा दिवाना झाला..

श्रीलंका -ग्वालियर ..१८३ चमिंडा वासला २ खनखनीत cover ला खेचून नाकातला वास घ्यायला लावलास रे...

इंग्लैंड -धर्मशाला..१३८ तुझाकडून वाचाव म्हणून तो एंडर्सन पायावर yorker मारू लागला, पण bc तू त्याला विनाटिकित helicopter मध्ये बसवून थेट Birmingham ला सोडून आलास.. काय राव तुझा पाहुणचार.. अस करत्यात व्हय रं भावड्या.

१०-१५ वर्षात तुझ्यामुळे wicket keeping मध्ये एकही वाईट दिवस आमच्या वाट्याला तू दिला नाहीस.. आज ३६ वर्षाच्या वयातही २२ यार्ड धावपट्टी पार करताना तू usen bolt ला ही मागे टाकतोस...

तू खूप काही दिलस, खूप काही शिकवलस...

आपल्या ध्येयाँवर तू प्रेम करायला शिकवलस..
मुलगी जन्मली, पण तू ऑस्ट्रेलियात, तिला तू चक्क ४० दिवसांनी पाहिलस.. तेव्हा पत्रकारांनी विचारल होत, अस का केलस ?.. तुझ उत्तर होतं.."आधी देश, इथ भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून यायच्या.. " इतका कसा रे तू कणखर वागू शकतोस..?

विराट, जडेजा, रैना, अश्विन, शमी, रहाणे ही तुझी investment.. आणिबाणीच्या क्षणी तू चक्क seniors ना डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होतास.. किती टिका सहन केल्यास. पण आज या investment चा refundable profit च मात्र तू credit नाही घेत..

संघ हरला की तू संपूर्ण जबाबदारी स्वतावर घेतोस पण जिंकल्यावर frame मध्ये मात्र corner ला दिसतोयस... कस शक्य होत रे तुला हे..?

आज ३ऱ्या नंबर वर येऊन अधिराज्य गाजवणारा कोहली, opening ची सुरुवात करायला तू संधी दिल्यासोबत २ द्विशतक झळकवणारा रोहित शर्मा, ६ षटकार ठोकणारा युवी पाजी, रैना-पांड्या सारखे finisher, पूर्वी १० धावा म्हटल तरी तंतरणारी आपली bowling आज ४ धावांचीही सहज match जिंकवणारा Bumraah...आणि नुसत्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर match फिरवणारा सर जडेजा.. या पोरांच्या डोक्यावर तुझा परिसरूपी हाथ पडला आणि पोरांनी अख्या जगाच सोनच लूटलं...

Test ची retirement announce करण्याआधी रात्री १ वाजता तू रैनाला hotel room मध्ये बोलावून घेऊन त्या White jercy वर सेल्फी घ्यायला लावलस. रैनाला काही समजायच्या आत तू म्हटलास, "इथून पुढ मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही.." आणि तशीच ती white jercy घालून तू झोपलास...

हरल्यावर इतरांसारख्या ब्याटी, Gloues तू फेकल्या नाहीस.. शांतच राहिलास.  इथ गल्लीत एक wide बॉल फेकला की अख्या खांदानाचा उद्धार होतो राव आमच्या इथ.. तू एवढं कसा रे cool...

"मी जेव्हा मरणाला टेकेल तेव्हा मला full volume मध्ये रवि शास्त्रीच्या commentary सोबत धोनीचा world cup winning षटकार दाखवा.." हे चक्क सर गावसकरांचे बोल..

"तू ज्या दिवशी क्रिकेट खेळण बंद करशील त्या दिवशी तुझ्या घराबाहेर तुझ्या निर्णयाच्या निषेधार्थ रस्त्यावर उत्तरणारा मी पहिला असेल.." prince of kolkata खुद्द दादा म्हणतो अस...

"तू दूसरा गिलख्रिस्ट नाही होऊ शकत, कारण तू पहिला महेंद्रसिंग धोनी झालायस.." चक्क यष्टिमागच्या तुफानाच हे वक्तव्य...

माही,
तुझ्या कडून महत्वाच शिकतोय,


" ज्याला जिंकायच आहे त्याला हे माहित पाहिजे कधी लढ़ायच आहे आणि कधी शांत राहयचंय..."

#देखो_माही_मार_रहा_हैं....
#शुभेछ्या 🎂🎂💐 #MSDhoni

Recent Posts
 • सिक्रेट सुपरस्टार
 • शाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात
 • सैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार
 • देखो_माही_मार_रहा_हैं
 • आदिमाया श्री सप्तशृंगी माता
 • नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा
 • नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…
 • विजयादशमी
 • सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…
 • तुम्ही केल्या या चुका तर अवेळी व्हाल म्हातारे, अवश्य टाळा…
 • असे झाले मराठी फिल्ममध्ये सनी लिओनीच्या गाण्याचे शूटिंग, बघा ‘बॉईज’ची On Location झलक
 • रेशमी दुःखाची कथा सिनेरिव्ह्यू
 • लूक्सवर द्या लक्ष
 • व्हायरसला आळा घालण्यासाठी…
 • सावधान…पसरलंय कार्डिंगचं जाळं!

The post देखो_माही_मार_रहा_हैं appeared first on Achiseekh ( Marathi ).This post first appeared on Achiseekh, please read the originial post: here

Share the post

देखो_माही_मार_रहा_हैं

×

Subscribe to Achiseekh

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×