Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

नक्षलवादी ते कचरापेटीत टाकलेल्या मुलीला दत्तक घेणे, मिथुन चक्रवतींच्या आयुष्यातले रोचक किस्से!!

चित्रपटसृष्टीत डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती ६९ वर्षांचे झाले आहेत. १६ जून, १९५० रोजी कोलकाता मध्ये जन्माला आलेल्या मिथुन यांचे खरे नाव ‘गौरांग चक्रवर्ती’ आहे. परंतु , हे नाव त्यांनी कधीच चित्रपटांमध्ये वापरले नाही. मिथुन बॉलीवूडच्या काही अशा कलाकारांमध्ये गणले जातात ज्यांना चित्रपटात येण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची चित्रपटसृष्टी संबंधित पार्श्वभूमी अथवा एखाद्या ‘गॉडफादर’ चा पाठिंबा नव्हता परंतु तरीही मेहनत करून चित्रपट सृष्टीत आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांचा जन्मदिवस निमित जाणून घेऊया त्यानाच आयुष्यातले काही रोचक किस्से.

विवाहित असूनही, श्रीदेवीशी केला दुसरा विवाह

मिथुनने १९७६ साली ‘मृगया’ या चित्रपटाद्वारे आपली कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर, मिथुनने अनेक हिट चित्रपट दिले. तो एक यशस्वी अभिनेता होता, म्हणून त्याचे नाव त्याच्या सह-कलाकार रंजीता, योगिता बाली, सारिका आणि इतरांशी जोडले गेले, परंतु श्रीदेवीं बरोबर असलेल्या संबंधाबरोबर त्यांची सर्वात जास्त चर्चा झाली. मिथुन-श्रीदेवी यांनी १९८४ सालच्या ‘जाग उठा इंसान’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या अफेयर ची चर्चा सर्वत्र होऊ लागली. मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतः एका मुलाखतीत कबूल केले की त्यांनी गुप्तपणे श्रीदेवीशी लग्न केले आहे.

कचरा पेटीमध्ये सोडून दिलेल्या मुलीला घेतले दत्तक

मिथुन चक्रवर्ती यांनी दिशांनी या त्यांचा मुलीला दत्तक घेतले. मिथुन याना दिशांनी एका कचऱ्याचा पेटीमध्ये मिळाली होती. जेव्हा त्यांनी तिला बघितले त्यांनी त्याच क्षणी तिला दत्तक घेण्याचे ठरवले, त्यांची पत्नी योगिता बाली यांनीही या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आणि लहान मुलीला त्यांचा घरी आणले. तिच्या पालनपोषणात तिला कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवू दिली नाही, आज दिशांनी मोठी झाली आहे शिवाय ती स्टायलिश लुक मध्ये वावरताना दिसते.

चित्रपटात येण्यापूर्वी नक्षलवादी

मिथुन चित्रपटात येण्यापूर्वी एक नक्षलवादी होते. परंतु एका अपघातात आपल्या भावाच्या झालेल्या मृत्यूमुळे त्याला आपल्या कुटुंबाकडे परत जावे लागले आणि त्यांच्यावर कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली. त्यांना नाचण्याची खूप आवड होती आणि यामुळे त्यांनी स्टेज शो सुरू केले.
त्यानंतर त्यांनी अभिनय शाळेत प्रवेश केला.

350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले

आतापर्यंत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि बॉलीवुडमध्ये अजूनही सक्रिय आहे. वारदात, अविनाश, जाल, डिस्को डांसर, भ्रष्टाचार, घर एक मंदिर, वतन के रखवाले, हमसे बढ़कर कौन, चरणों की सौगंध, हमसे है जमाना, बॉक्सर, बाजी, कसम पैदा करने वाले की, प्यार झुकता नहीं, करिश्मा कुदरत का, स्वर्ग से सुंदर यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९३ ते १९९८ हा त्यांचा सर्वात कठीण काळ होता. जेव्हा त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते या दरम्यान त्यांचे ३३ चित्रपट एकसाथ फ्लॉप झाले होते.असे असूनही दिगदर्शकामध्ये त्यांच्या स्टारडम चा इतका प्रभाव होता कि या काळात देखील त्यांनी तब्बल १२ चित्रपट साइन केले होते.

मिथुन जवळ 100 पेक्षा जास्त कुत्रे

फारच कमी लोकांना हे माहित आहे की चित्रपटा येण्यापूर्वी रसायनशास्त्रातील पदवीधर मिथुन हे नक्षलवादी होते. कुटुंबाच्या दबावाखाली त्यांनी नक्षलवादांपासून अंतर दूर केले आणि बॉलीवूडकडे वळले. मुंबईशिवाय, मिथुन यांचा उटी येथे एक आलिशान बंगला आहे. त्यांच्या मुंबईच्या घरात ३८ कुत्रे आहेत, तर उटीच्या बंगल्यात त्याचा दुप्पट ७६ पाळीव कुत्रे आहेत

The post नक्षलवादी ते कचरापेटीत टाकलेल्या मुलीला दत्तक घेणे, मिथुन चक्रवतींच्या आयुष्यातले रोचक किस्से!! appeared first on गर्जा महाराष्ट्र.This post first appeared on Garja Maharashtra, please read the originial post: here

Share the post

नक्षलवादी ते कचरापेटीत टाकलेल्या मुलीला दत्तक घेणे, मिथुन चक्रवतींच्या आयुष्यातले रोचक किस्से!!

×

Subscribe to Garja Maharashtra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×