Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Avanger ‘Thor’ ने का ठेवलं आपल्या मुलीचं नाव ‘इंडिया’?

Marvel Comics च्या अवेंजर्स (Avengers ) सीरिज च्या चित्रपटात थोर (THOR) ची भूमिका साकारणाऱ्या क्रिस हेम्सवर्थ (Chris Hemsworth) सध्या भारतीय मिडीया आणि त्याच्या भारतीय फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे.त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. क्रिस ने नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या मुलीचं नाव इंडिया (INDIA) असे ठेवले आहे. त्याने आपल्या देशाचे नाव आपल्या मुलीला दिल्याने अनेक भारतीय चाहत्यांनी या निणर्याचे आनंदने स्वागत केले.

आईएएनएस (INS) ला दिलेल्या एका मुलाखतीत क्रिस ने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवले असल्याचे सांगून, असे करण्याचे कारण त्याने त्याची पत्नी एल्सा पातकी ( Elsa Pataky) असल्याचे सांगितले, त्यांनी म्हटले,

”माझ्या पत्नी ने तिच्या आयुष्यातला बराचसा काळ भारतात घालवला आहे, आणि हेच कारण आहे ज्यामुळे तिने आपल्या मुलीचं नाव इंडिया ठेवण्याचे ठरवले.”

क्रिस ने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवण्या बरोबरच, या देशासाठी आपल्या हृदयात देखील विशेष स्थान असल्याचे सांगितले, ख्रिस म्हणतो, भारतात काम करण्याचा अनुभव थोडासा भीतीदायक परंतु खूपच मजेशीर होता, तो म्हणतो, भारतात काम करताना त्याला ‘रॉकस्टार’ सारखी अनुभूती झाली.

गेल्याच वर्षी क्रिस Netflix च्या ‘Dhaka’ या चित्रपटाच्या शूटिंग साठी भारतात आला होता. त्यावेळी त्याने अहमदाबाद आणि मुंबई मध्ये शूटिंग केली होती

क्रिस ने सांगितले,

”डायरेक्टर च्या प्रत्येक कट नंतर स्टेडियम मध्ये फॅन्स जोरजोरात ओरडायचे, आवाज द्यायचे, ज्यामुळे मला रॉकस्टार सारखी फीलिंग यायची, भारतात प्रत्येक ठिकाणी ज्या जोशात आमचे स्वागत व्हायचे ते विलक्षण होते”

या  इंटरव्यू दरम्यान जेव्हा क्रिस ला बॉलीवुड मध्ये काम करण्याविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्याने, ”माझी या बाबतीत काही बोलणी चालू आहेत, भविष्यात कदाचित मी करेनही ”

क्रिस ने Thor, Avengers, Star Treck, Rush या सारख्या अनेक गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, त्याची Marvel Comics च्या Avengers आणि Thor या चित्रपटाच्या सिरीज मध्ये साकारलेल्या थोर या  सुपरहिरोच्या भूमिकेला विशेष प्रसिद्दी लाभली

The post Avanger ‘Thor’ ने का ठेवलं आपल्या मुलीचं नाव ‘इंडिया’? appeared first on गर्जा महाराष्ट्र.This post first appeared on Garja Maharashtra, please read the originial post: here

Share the post

Avanger ‘Thor’ ने का ठेवलं आपल्या मुलीचं नाव ‘इंडिया’?

×

Subscribe to Garja Maharashtra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×