Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

'दुर्ग किंवा किल्ल्यांबद्दलचे' प्राचीन उल्लेख


'दुर्ग किंवा किल्ला' मानवजातीच्या इतिहासातील एक महत्वाचे अंग आहे. जेव्हापासून मानवाला आपल्या स्वतःची आणि मानावासोबत असणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेची जाणीव झाली तेव्हा मानवाने नैसर्गिक गुहांचा आधार घेतल्याचे पुराव्यानुसार स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशातील 'भीमबेटका गुहा' या त्याचे उत्तम उदाहरण आहे. मानव जसा जसा विकसित होत गेलेला दिसतो तसेच विविध कालखंडात जे निरनिराळे शोध मानवाच्या आयुष्यात लागले तसे तसे स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मानवाची गरज विविध कालखंडात वेगवेगळी झालेली दिसते. त्यामध्ये या 'दुर्गांचा' विकास झालेला आपल्याला पहायला मिळतो.

मध्ययुगामध्ये महाराष्ट्रातील किल्यांना खूप मोठे महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते. या किल्ल्यांंच्यामुळे  मराठ्यांनी मुघल सैन्याला खूप मोठा प्रतिकार केला आणि संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल असलेली 'मुघल राजवट' याच किल्यांच्या जोरावर नेस्तनाबूद झालेली आपल्याला इतिहासात पहायला मिळते. ह्याच 'दुर्गांबद्दल किंवा किल्ल्यांबद्दल आपल्याला प्राचीन संदर्भ पहाणे देखील गरजेचे ठरते. प्राचीन काळामध्ये देखील किल्ल्यांबद्दल आपल्याला महत्व दिसून येते.

मध्यप्रदेशातील 'भीमबेटका गुहा'
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

अनेक राज्य या दुर्गांच्या मदतीने उभे राहिलीली आपल्याला दिसतात. विविध कालखंडात विविध राजे या दुर्गांच्या मदतीने उभे राहिलेले आपल्याला दिसतात काही वेळेस या दुर्गांच्या गमाविण्याने संपूर्ण राजसत्ता देखील उलथून पडलेल्या आपल्याला दिसतात. अशी इतिहासात अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील. असे हे 'किल्ले' यांचे महत्व आपल्याला प्राचीन कालखंडापासून पहायला मिळते. 

प्राचीनकाळी 'दुर्ग' ही एकच संज्ञा वापरली जात असे आपल्याला दिसते. परंतु मध्ययुगात किल्ल्यांचे महत्व अधिक वाढल्याने दुर्ग, गड, किल्ले हे शब्द सर्रास वापरले गेलेले आपल्याला दिसतात तेच शब्द आजही वापरात आहेत. मुळात दुर्ग, गड, किल्ले, आणि कोट हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. एकंदरीतच या 'दुर्गांचे' महत्व प्रत्येक कालखंडात किती महत्वाचे होते हे आपल्याला दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मध्ययुगामध्ये महाराष्ट्रातील किल्यांना खूप मोठे महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते.

ऋग्वेदामधील दुर्गांचा उल्लेख:-

किल्ल्यांसंबंधित प्राचीन उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळून येतो. ऋग्वेदामध्ये कडेकोट बंदोबस्त असलेल्या दुर्गांचे अनेक उल्लेख आढळून येतात. यामध्ये ऋग्वेदात ५ व्या मंडलातील सुक्त ३४ ऋचा ७ आणि ऋग्वेदात ७ व्या मंडलातील सुक्त २५ ऋचा २ (५.३४.७; ७.२५.२) यामध्ये आलेला उल्लेख पुढीलप्रमाणे आहे. एका ठिकाणी तर चिरेबंदी कोट असलेल्या नगरांचा उल्लेख हा केलेला आपल्याला बघायला मिळतो (४.३०.२). अशा कोट असलेल्या नगरांना 'पूर' असे संबोधतात. 

तसेच वी.आर.रामचंद्र त्यांच्या 'वॉर इन एन्शिअंट इंडिया' यांनी ऋग्वेदातील उल्लेख त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आपल्याला पहायला मिळतो तो पुढीलप्रमाणे:-

"Going back to Rigveda Samhita we find tribes living in fortification known by the name 'pur' an earth-work strengthened by a stone wall. There are numerous references to such kinds of fortress buildings which were besieged and destroyed by the invading hosts. In the later Bramhan Literature also there is distinct reference to existence of forts. In the annual sacrifice portion of the Aitareya Bramhana the three agnis of fires are described as forming three forts to prevent the Asuras from disturbing the sacrifies

अश्या प्रकारे हे उल्लेख आपल्याला खूप महत्वाचे ठरतात त्यावरून त्याकालखंडातील किल्ल्यांचे महत्व आपल्याला समजण्यास मदत होते. तसेच ऋग्वेदात शंबर आणि वेदिकांशी जे संघर्ष झाले त्याबाबत ऋग्वेदामध्ये ऋषींच्या विविध ऋचा आहेत त्यामध्ये शंबरने पर्वतावर अनेक दुर्ग बांधून हा संघर्ष केल्यावर अखेरीस तो मारला गेला. यामध्ये आपल्याला ऋग्वेदात देखील 'गिरीदुर्गांंना' किती महत्व होते हे दिसून येते. 


'लोहमय दुर्ग' नष्ट केले म्हणून 'इंद्राला' 'पुरंदर' नाव मिळाले असे म्हटले जाते.
(छायाचित्र मोबाईलने काढले आहे) 

तसेच अजून एक जो ऋग्वेदात आपल्याला उल्लेख आढळतो तो म्हणजे 'वृंगदाचे' शेकडो दुर्ग नष्ट करण्यात 'ऋजिश्वान' यशस्वी झाला होता (१.५३.८) 'वामदेव ऋषींना' लोहमय किल्ल्यात ठेवले असतानाही ते श्येन पक्ष्याच्या वेगाने बाहेर आले असा सरळ उल्लेख आपल्याला ऋग्वेदात मिळतो. यावरून 'लोहमय' किल्ला हा किती बळकट आणी अभेद्य असावा असे मानण्यास नक्कीच हरकत नाही. ऋग्वेदात आपल्याला हा देखील उल्लेख मिळतो कि 'इंद्राने' असे अनेक 'लोहमय दुर्ग' नष्ट केलेले आहे. हे 'दुर्ग' पाडल्यामुळे 'इंद्राला' 'पुरंदर' नाव मिळाले असे म्हटले जाते. म्हणून वरील सर्व उल्लेखावरून वेदकाळात युद्धतंत्राच्या दृष्टीने दुर्गांंना खूप महत्व होते असे दिसून येते. वेदकाळातील किल्ल्यांच्या प्रकारासंबंधी थोडीफार कल्पना ही मनुस्मृतीमध्ये आलेल्या 'दुर्गांच्या' माहितीवरून करता येईल.

मनुस्मृतीमध्ये आलेला दुर्गांचा उल्लेख:-

मनुस्मृतीमध्ये सातव्या अध्यायात दुर्गांसंबंधी चर्चा आलेली आहे प्रचीनातेच्या दृष्टीने दुर्गांचे प्रकार आणि दुर्गांचीशक्ती किती महत्वाची आहे हे सांगितलेले आपल्याला दिसते. त्यामध्ये जे महत्वाचे श्लोक आपल्याला आढळून येतात ते पुढीलप्रमाणे:-

ततो दुर्गं च राष्ट्रं च लोकं च सचराचरम् |
    अन्तरिक्षगतांश्चैैव मुनीन्देवांश्च पीडयेत् ||२९||

श्लोकाचा अर्थ:- 

राजाच्या नाशानंतर किल्ला, राज्य आणि स्थावर जंगम प्रजा आणि अंतरिक्षात राहणारे पक्षी आणि वायू वगैरे देवता आणि सर्व मुनींना त्या अधर्मी राजाचा दंड पिडीत करतो. 

धन्वदुर्गंं महीदुर्गमब्दुुर्गंं वार्क्षमेव  वा |
    नृदुर्गंं गिरीदुर्गंं वा समाश्रित्य वसेत्पुुरम् ||७०||  


श्लोकाचा अर्थ:-

जेथे धनदुर्ग, महिदुर्ग, अब्दुर्ग (जलदुर्ग), वृक्षदुर्ग, नृदुर्ग, गिरिदुर्ग किंवा सेना दुर्ग आहे अशा दुर्गांचा आश्रय घेऊन गाव वसवावे.

मनुस्मृतीमध्ये हे सहा दुर्गांचे प्रकार दिलेले आपल्याला दिसतात. हे दुर्गांचे सहा प्रकार पुढीलप्रमाणे:-

१. धनदुर्ग:-
सभोवार वीस कोसपर्यंत पाण्याचा पुरवठा नसणारा दुर्ग.

२. महिदुर्ग:-
ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंचीचे, युद्धाचा प्रसंग आल्यास ज्यावरून व्यवस्थित फिरता येईल आणि झरोक्यांनी युक्त असलेल्या खिडक्या (जंग्या) ठेवलेल्या आहेत, अशा तटांनी युक्त असलेला दुर्ग.

३. अब्दुर्ग (जलदुर्ग):-
सभोवार भरपूर पाण्यामुळे नैसर्गिक संरक्षण मिळालेला दुर्ग.

४. वृक्षदुर्ग:-
तटाच्या बाहेर चारही बाजूला चार कोसपर्यंत मोठाले वृक्ष, काटेरी झाडे, आणि वेलीच्या जाळ्या यांनी वेष्टिलेला दुर्ग.

५. नृदुर्ग:-
हत्ती, घोडे, रथ, पायदळ या चतुरंग सेनेने रक्षण केलेला दुर्ग.

६. गिरिदुर्ग:-
डोंगरी उंचवट्यावर पुरेसा पाणी पुरवठा असणारे, झाडे आणि धान्य पिकवता येईल असे, पण जाण्यासाठी सहसा एखादीच वाट असणारे स्थान. 

डोंगरी उंचवट्यावर पुरेसा पाणी पुरवठा असणारे, झाडे आणि धान्य पिकवता येईल असे, पण जाण्यासाठी सहसा एखादीच वाट असणारे स्थान. 

सर्वेण तु प्रयत्नेन गिरीदुर्गंं स्मश्रयेत् |
   एषां हि बाहुगुण्येन गिरीदुर्गंं विशिष्यते || ७१||

श्लोकाचा अर्थ:-

या सहा प्रकारच्या दुर्गांमध्ये 'गिरिदुर्ग' हा अत्यंत श्रेष्ठ. म्हणून राजाने गिरीदुर्गाचा आश्रय संकटकाळी घ्यावा. 

त्रीण्याद्यान्याश्रितास्त्वेषां मृगगर्ताश्रयाsप्सरा: |
त्रीष्युत्तराणि क्रमशः प्लवग्डमनरामरा: ||७२||  

श्लोकाचा अर्थ:-

ह्या सहा प्रकारच्या किल्ल्यात सहा प्रकारचे प्राणी राहतात. ह्यातील धनदुर्गात मृग, महिदुर्गात मुंगुस इत्यादी, अब्दुर्गात म्हणजेच जलदुर्गात अप्सरा आणि जलचर, वृक्षदुर्गात वानर, नृदुर्गात मनुष्य, आणि गिरीदुर्गात किंवा पहाडदुर्गात पर्वतवासी देवजाती असतात तसेच  गिरीदुर्गांंना देव आपले निवासस्थान समजतात.

यथा दुर्गाश्रितानेतान्नोपहिंसन्ति शत्रवः|
तथाsरथो न हिंसन्ति नृपं दुर्ग समाश्रितम ||७३||  

श्लोकाचा अर्थ:-

जसे ज्या दुर्गवासियांना व्याघ्रादि शत्रू पीडा देऊ शकत नाही तसेच दुर्गाचा आश्रय घेणाऱ्या राजाला शत्रूपक्षीय राजे पीडा देऊ शकत नाही.

एक: शतंं योधयति प्राकारस्थो धनुर्धर:|
शतं दशसहस्त्राणि तस्माद् दुर्गंं विधीयते ||७४|| 


दुर्गांच्या आश्रयाने लढणारा एक एक योद्धा हा बाहेरील शंभर मनुष्यांशी युद्ध करू शकतो.

श्लोकाचा अर्थ:-

दुर्गांच्या आश्रयाने लढणारा एक एक योद्धा हा बाहेरील शंभर मनुष्यांशी युद्ध करू शकतो तसेच दुर्गाच्या आश्रयाने शंभर योद्धे हे बाहेरील दहा हजार योध्यांशी युद्ध करू शकतात.

तस्यादायुधसंम्पन्नं धनधन्येन वाहनै: |
ब्राम्हणैै: शिल्पभिर्यन्त्रैैर्यवसेनोदकेन च ||७५||

तस्य मध्ये सुपर्याप्तंं कारयेद् गृहमात्मन: |
गुप्तं सर्वर्तुकं शुभ्रं जलवृक्षसमन्वितम् ||७६||

श्लोकाचा अर्थ:-

राजाने किल्ल्यामध्ये विविधप्रकारची आयुधे, विविध धनधान्ये, वाहने, ब्राम्हण, लोहार, सोनार इत्यादी अनेक विविध शिल्पकला येणारे लोकं, यंत्रे, गवत आणि विपुल जल यांचा संग्रह करावा. तसेच किल्ल्यात स्त्रीगृह, देवागार, आयुध मंदिर, अग्निशाला आणि भीतीने रक्षलेले आणी सर्व ऋतुमध्ये फल, पुष्पादियुक्त आणि रंग लावलेले तसेच पाणी आणि वृक्ष युक्त आपले घर बनवावे.

राजाने किल्ल्यामध्ये विविधप्रकारची आयुधे, विविध धनधान्ये, वाहने, ब्राम्हण, लोहार, सोनार इत्यादी अनेक विविध शिल्पकला येणारे लोकं, यंत्रे, गवत आणि विपुल जल यांचा संग्रह करावा. 

हे संपूर्ण वर्णन दुर्ग समृध्द कसा ठेवावा याबाबतचे वर्णन मनुस्मृतिकार आपल्या मनुस्मृती मध्ये करतो.

सिंधू संस्कृती:-

विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि या संस्कृतीच्या शोधामुळे संपूर्ण जगाचे डोळे दिपून गेले. या गोष्टीने एक महत्वाची गोष्ट झाली ति म्हणजे भारताला अलेक्झांडर पूर्वीचा इतिहास नाही असे ज्यांचे म्हणणे होते त्यांची तोंडे मात्र या शोधाने गप्प झाली असो, या सिंधू संस्कृतीचा कालखंड हा इ.स.पू. ३२०० च्या मागे जातो आहे हे नव्याने सिद्ध झाले आहे आजही तेथे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.  

या सिंधू संस्कृतीची वसाहत रचना आपण पहायला गेलो तर त्यामध्ये शहरे, लहानमोठी गावे, खेडी आणि वस्त्या यांचे अवशेष आहे. सिंधू संस्कृतीमधली शहरे ही अत्यंत योजनाबद्ध होती. त्यामध्ये एका बाजूला जे शासनकर्ते किंवा राज्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तेथे 'बालेकिल्ला' (Citadel) बांधलेला होता आणि दुसऱ्या बाजूला सामान्य लोकांसाठी 'सामान्य वस्ती' उभारलेली होती ज्याला आज 'लोअर सिटी' असे म्हणतात.

सिंधू संस्कृतीचे शासनकर्ते किंवा राज्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तेथे 'बालेकिल्ला' (Citadel) बांधलेला होता.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

संपूर्ण वसाहतीला तटबंदी बांधलेली होती. अश्याप्रकारे धोलाविरा आणि कच्छ मधील रचना थोडीशी वेगळी पाहवयास आपल्याला मिळते. यामध्ये ईशान्येकडील कोपऱ्यात 'बालेकिल्ला' (Citadel) हा असून तो १५० x १५० मीटर (५०० x ५०० फुट) एवढा आहे. तेथे एका बाजूस शासनकर्ता आणि दुसऱ्या बाजूस अधिकाऱ्यांची निवासस्थाने पहायला मिळतात. तसेच बालेकिल्ल्याच्या बाहेर उत्तरेच्या बाजूस काही अंतर सोडून कारागीर आणि शेतकरी आणि इतर मंडळींची वस्ती होती. याच भागाला लागून कामगार लोकं येथे राहात असत. या दोघांच्या मध्ये एक भिंत होती. अशीच रचना ही हडप्पा आणि मोहंजोदारो या सिंधूसंस्कृतीच्या रचनेमध्ये दिसून येतात. 

या प्राचीन दुर्ग अवशेषांमुळे सिंधू संस्कृतीला दुर्गांच्या इतिहासात खूप महत्व आहे. अत्यंत प्रगत नगररचना आपल्याला या संस्कृतीमध्ये किल्ल्याच्या आजूबाजूला दिसून येते.

महाभारत:-

महाभारतामध्ये दुर्ग आणि त्यामधील वास्तूविषयी खूप माहिती आलेली आपल्याला पहायला मिळते. महाभारताच्या शांतीपर्वात ही माहिती आपल्याला मिळते. यामध्ये जो उल्लेख मिळतो तो असा "भीष्मांच्या मते पुरुषसंचयासारखा दुसरा कोणताही कोष राजाला श्रेष्ठ नाही, आणि शास्त्रांमध्ये जे सहा दुर्ग सांगितले आहेत त्यामध्ये 'नरदुर्ग' हा दुर्भेद्य म्हणून सांगितला आहे.

युधिष्ठिराने परत भीष्मांना प्रश्न विचारला आहे तो असा कि राजाने जेथे राहावयाचे, ते नगर कशा प्रकारचे असावे किंवा नवीन बांधावयाचे झाल्यास ते कोणत्या प्रकारे बांधावे? याबद्दल भीष्म सांगतात ते पुढीलप्रमाणे; "विशेषतः दुर्ग कसे असावेत ते सांगतो. ते ऐकून तु तशा प्रकारचे दुर्ग बांधून त्यांच्या आश्रयाने नगरे वसवावीत, त्यामध्ये सर्व प्रकारची संपत्ती असावी आणि पुष्कळ लोकं राहण्याची व्यवस्था असावी.

याला जरासंध का आखाडा असे राजगिर येथील लोकं म्हणतात. 
आजही या ठिकाणी उत्खननाचे काम चालू आहे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

हे दुर्ग कसे असावेत याबद्दल त्यांनी सांगितले आहे दुर्ग, भूदुर्ग, गिरीदुर्ग, मनुष्यदुर्ग (नगरासभोवती मनुष्यांचा पहारा ठेवणे), मृदुर्ग (नगराभोवती मृत्तिकेचा तट घालणे) आणि वनदुर्ग (नगराभोवती दुर्

Share the post

'दुर्ग किंवा किल्ल्यांबद्दलचे' प्राचीन उल्लेख

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×