Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पुस्तक

मुलगी आपल्या वडिलांबरोबर बोलत बसलेली असताना अचानक तिचा मित्र तिथे आला.
“तू लॉरेंज फ्लॅमिनचं ‘DADDY IS HOME’ हे पुस्तक न्यायला आला आहेस का ?” तिनं त्याला विचारलं.
“नाही नाही, रॉबिन क्लामिननं लिहिलेलं ‘WHERE SHOULD I WAIT FOR YOU’ हे पुस्तक न्यायला आलोय”, तो म्हणाला. 
“सॉरी, हे पुुस्तक माझ्याकडे नाही. पण तुला अमर श्रीवास्तव यांचं “UNDER THE MANGO TREE’ हे पुस्तक हवं असेल तर घेऊन जा”, ती म्हणाली.
“ठीक आहे, तू कॉलेजला जाताना Retail Management Guide चं ‘CALL YOU IN FIVE MINUTES’ हे पुस्तक आणायला विसरू नकोस” त्यानं बजावून सांगितलं.
“नक्की ! मी कॉलेजला जाताना ‘I WONT LET YOU DOWN’ हे पुस्तकही घेऊन येईन”, तिनं निक्षून सांगितलं.
मित्र निघून गेल्यावर तिचे वडील तिला म्हणाले,” हा मुलगा इतकी पुस्तकं कशी काय वाचणार आहे ?”
“बाबा, हा अतिशय स्मार्ट, बुद्धिमान आणि हुशार मुलगा आहे”, ती म्हणाली.
” ठीक आहे, ठीक आहे ; पण त्याला मायकल क्रूजचं ‘OLD MEN ARE NOT STUPID’ हे पुस्तक द्यायला मात्र विसरू नकोस हं !” बाबा वृत्तपत्र वाचता वाचता म्हणाले.

_*


Filed under: Uncategorized

Share the post

पुस्तक

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×