Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

शाळा

मराठी पाचवी किंवा सहावी मध्ये मी शिकत असतानाची ही गोष्ट आहे. माझ्या लांबच्या नात्यातल्या एका मोठ्या भावाचे लग्न तेंव्हा नुकतेच ठरले होते व त्या वेळच्या पद्धतीनुसार लग्नाची बैठक आमच्या घरी चालू होती. माझ्या या भावाचे आई-वडील पुण्यातच रहात असल्याने साहजिकच आपल्या मुलाचे लग्न पुण्यात करावे असे त्यांना वाटत होते. मुलीचे आई-वडील पण पुण्यातच रहात असल्याने साहजिकच लग्न पुण्यात होईल अशीच सर्वांची अपेक्षा होती. बोलणी करताना मुलीच्या वडीलांनी मुलाकडच्या सर्व अपेक्षा अगदी सहजपणे मान्य केल्या असल्या तरी एका अटीवर मात्र ते ठाम होते. त्यांना आपल्या मुलीचे लग्न पुण्यात न करता त्यांचे वडिलोपार्जित घर असलेल्या, विदर्भातीलभिल्लारी या गावीच करायचे होते. मुलाकडच्यांची सर्व व्यवस्था व बडेजाव आपण उत्तम रित्या ठेवू व तक्रारीला अजिबात जागा ठेवणार नाही असे ते वारंवार सांगत होते. माझ्या भावाला ही मुलगी एकदम पसंत असल्याने माझ्या काकांना आपल्या भावी व्याह्यांची ही अट मान्य करण्याशिवाय गत्यंतरच राहिले नव्हते व लग्न डिसेंबर महिन्यात भिल्लारी मध्ये करायचे असे शेवटी बैठकीत ठरले होते. काकांचे व्याही, जाण्यायेण्याचा खर्च सुद्धा देण्यास तयार होते परंतु माझ्या काकांनी त्याची गरज नाही असे सांगून बैठकीचा शेवट गोड केला होता. आमचे लग्नाचे वर्‍हाड पुरुष, बायका आणि मुले हे सर्व मिळून निदान चाळीस पन्नास जणांचे तरी होणार असल्याने, आमच्या काकांनी मुंबईला खटपट करून, संध्याकाळी व्ही.टी स्टेशन वरून सुटणार्‍या हावडा मेल मधील डब्याचा एक भाग आमच्यासाठी आरक्षित करून घेतला होता व भिल्लारी गावाला वरपक्षानेजाण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करून ठेवली होती.

मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर हावडा मेल पकडण्यासाठी त्या दिवशी संध्याकाळी आम्ही जमलो होतो तेंव्हा सर्वच जण एक छान आउटिंग होणार या कल्पनेने सुखावलेले होते हे नक्की. जमलेल्या लोकांच्यात आज्या आजोबा यांसारखे काही थोडे लोक सोडले तर बहुतेक लोक तरुण किंवा मध्यम वयीन असल्याने एकंदरीत वातावरण उत्साहमय होते. गाडी फलाटाला लागल्यावर आमचा डबा शोधून आम्ही सर्व स्थानापन्न झालो. डब्याचा तो भाग आमच्यासाठीच आरक्षित असल्याने बाहरचे किंवा परके असे कोणी नव्हतेच त्यामुळे गाडी सुरू झाल्याबरोबर तरूण मुले आणि मुली यांचा  निराळा ग्रूप झाला तर मध्यम वयीन एकत्र झाले. गप्पा, चेष्टा यांना तर उतच आल्यासारखा दिसू लागला. मग जरा वेळाने काकू व इतर बायकांनी बरोबर आणलेले डबे उघडले गेले व मसालेदार खमंग पदार्थांचा दरवळ सर्व डबाभर पसरल्याने सर्वांचाच जठराग्नी प्रज्वलित झाला. या मस्त वातावरणात व गप्पांत वेळ कसा गेला हे कोणाला कळलेच नाही. रात्री 11 च्या सुमारास मंडळी जरा पेंगू लागल्या सारखी दिसू लागली व पुढचे दोन किंवा तीन तासच काय ती डब्यात जरा शांतता प्रस्थापित झाली. पहाटे तीन किंवा चार वाजण्याच्या सुमारास टी.सी. भिल्लारी रोड स्टेशन आता येईलच असे सांगून गेला व सगळ्यांचीच आवराआवर करून उतरण्याची तयारी व गडबड सुरू झाली.

गाडीचा वेग मंद होऊन ती थांबल्यावर सगळ्यांनी खाली उतरून घेतले व सामानाच्या पेट्याही उतरवल्या, तोपर्यंत गाडी सुरू होऊन निघूनही गेली होती. मी जरा आजूबाजूला नजर फिरवली. स्टेशन तसे छोटेखानीच दिसत होते. फलाटाच्या दोन्ही टोकांना व मध्यभागी खांबाच्यावर बसवलेले केरोसीनचे दिवे सोडले तर आजूबाजूला सर्व अंधारमय होते. क्षणभर मला आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही उतरलो असे वाटून गेले. पण पुढच्याच क्षणी आमच्या काकांचे होणारे व्याही आणि त्यांचे काही नातलग लगबगीने येताना दिसले व हायसे वाटले. भिल्लारीकरांनी मोठ्या अगत्याने आमचे स्वागत केले व कोणाला काही फराळ करायचा असला तर करूया व नंतर निघूया अशी सूचनाही केली. परंतु सगळ्यांचीच यथोचित चरंती आदल्या संध्याकाळपासून चालू असल्याने कोणाला भूक अशी नव्हती व त्यामुळे आपण आता निघूचया असे सर्वानुमते ठरले. स्टेशनच्या बाहेर आल्यावर बैलगाड्यांची एक लांबलचक रांग समोर उभी दिसली. प्रत्येक बैलगाडीत बसण्यासाठी गाद्या व पांघरायला जाडजूड कांबळी अशी व्यवस्था केलेली दिसली. कांबळीत स्वत:ला गुरफटून घेऊन आम्ही स्थानापन्न झालो. व आमचे बिर्‍हाड भिल्लारीच्या दिशेने निघाले. पहाटेच्या त्या थंडीमध्ये कांबळींत गुरफटून बसल्याने इतके उबदार वाटत होते की  बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या नादात झोप कधी लागली ते कळलेच नाही.

मला सकाळी जाग आली तेंव्हा सूर्य कासराभर तरी वर आलेला असावा. आमचा बैलगाड्यांचा ताफा समोर एक विस्तृत पटांगण असलेल्या एका बैठ्या इमारतीसमोर उभा होता. बाजूला रहाट्गाडगे बसवलेली एक विहीरही दिसत होती. या इमारतीतच आमचा जानोसा असल्याने आम्ही सर्वजण खाली उतरलो. इमारतीत दोन मोठे कक्ष व इतर छोट्या दोन तीन खोल्या होत्या. सर्व पुरुषवर्ग एका कक्षात व स्त्रीवृंद दुसर्‍या कक्षात अशी व्यवस्था होती. सर्वांसाठी पांढर्‍याशुभ्र चादरींनी आच्छादलेल्या  गाद्या पसरलेल्या दिसत होत्या ही सगळी व्यवस्था पाहून लग्नाचे वर्‍हाड खुष झाले. पुरुषवर्गासाठी विहिरीजवळ स्नानाची व्यवस्था होती व कोणाला गरम पाणी हवे असल्यास शेजारीच चुल्ह्यावर मोठ्या तपेल्यांत पाणी उकळत होते. स्त्रीवर्गासाठी न्हाणीघरे पलीकडेच दिसत होती.  आमचे सर्वांचे आवरून होते न होते तोवर फराळाची ताटे आल्याची सूचना मिळाली व आम्ही तिकडे वळलो. थोड्या वेळाने काकांचे होणारे व्याही आले व आज काही धार्मिक विधी व नंतर त्यांच्या घराजवळ घातलेल्या मांडवात जेवण असा आजचा कार्यक्रम ठरवल्यांचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विनंतीनुसार नवरा मुलगा, काका-काकू, इतर ज्येष्ठ मंडळी आणि समस्त स्त्री वृंद हे तयार होण्याच्या मार्गी लागले.  तरूणवर्ग आणि माझ्यासारखे अर्धवट वयाचे हे सर्व मिळून आम्ही निदान पंधरा ते वीस जण तरी होतो. आम्हाला लग्नघरात जाऊन मांडवात बसण्यात काहीच रस वाटत नव्हता. आमच्यापैकी एकाने आपण गावात फेरफटका मारून नंतर भोजनाच्या वेळी लग्नघरी जाऊया असा बूट काढला व सर्वानुमते तो संमतही झाला. काकांची परवानगी घेऊन आम्ही मग लगेचच बाहेरच पडलो.

हे भिल्लारी गाव बहुधा दहा पंधरा हजार वस्तीचे गाव असावे असे प्रथम दृष्टीक्षेपात तरी मला वाटले. गावात एक प्रमुख बाजारपेठेमधून जाणारा रस्ता, त्याला दोन्ही बाजूंना जोडणार्‍या गल्ल्या व या गल्ल्यांना जोडणार्‍या अनेक उपगल्ल्या एवढेच गावाचे स्वरूप होते. बहुतेक ग्रामस्थांची बैठी घरे या उपगल्ल्यांच्या आजूबाजूला बांधलेली असावीत असे वाटत होते.  मुख्य रस्त्यावर थोडीफार दुकाने दिसत होती. त्यात वाणीसामान, कापड-चोपड असलीच दुकाने दिसली. एक दोन दुकानांसमोर चहा-कॉफी व फराळाचे जिन्नस मिळतील असे खडूने एका पुठ्ठ्यावर लिहून तो पुठ्ठा टांगलेला दिसत होता. काचेची गोळी बसवलेल्या सोडा वॉटरच्या बाटल्यांची रांगही एक दोन ठिकाणी दिसत होती. थोडक्यात म्हणजे या गावात वेळ घालवता येईल किंवा फिरता येईल असे काही स्थानच नव्हते हे उमगायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही.

कंटाळा आल्यानेआता लग्नघरी उभारलेल्या मांडवाकडे परत वळावे असे मनात येत असतानाच आम्हाला अचानक समोर उभे असलेले एक गृहस्थ दिसले. डोक्यावर वर्‍हाडी पद्धतीचे पण अतिशय उत्तम रितीने बांधलेले पागोटे, पांढरा परीट्घडीचा सदरा, त्यावर क्रीम कलरचा कोट, पांढरेशुभ्र धोतर अणि पायात पॉलिश केलेले पंप शू असा त्यांचा वेश दिसत होता. त्यांनी आमच्याकडे बघून स्मित हास्य केले व ते म्हणाले. “ मी एकबोटे, इथल्या शाळेचा मुख्याध्यापक आहे.” आम्हा सर्वावर नजर फिरवत, “ तुम्ही काय मुंबईचे पाव्हणे का?” अशी पृच्छा त्यांनी केली. आमच्या टोळक्यात सर्वात मोठे असणार्‍या एक दोघांनी आम्ही काही जण मुंबईचे तर काही जण पुण्याचे असल्याचे सांगितल्यावर त्यांनी हसून मान डोलवली व ते पुढे म्हणाले की आमचे गाव लहानसे असले तरी या गावातली म्हणजे ते मुख्याध्यापक असलेली शाळा मोठी नावाजलेली आहे.  या बाजारपेठेने सरळ गेले की उजव्या हाताची शेवटची गल्ली लागते. या गल्लीतून आत गेले की शाळा समोर दिसेल. शाळेच्या कांपाउंडभोवती भिंत आहे पण शाळेच्या इमारतीत असलेला क्लॉक टॉवर बाहेरून दिसत असल्याने शाळा सापडायला अगदी सोपी आहे. या शाळेतील एक दोघे दर वर्षी तरी मॅट्रिकच्या परिक्षेत पहिल्या 30 क्रमांकांत येतातच.  आम्हाला वेळ असला तर आम्ही त्यांच्या शाळेला जरूर भेट द्यावी. शाळेतील शिक्षकांना, मुला-मुलींना आनंदच वाटेल. आम्ही जरा विचार विनिमय केला व शाळेत चक्कर मारून येऊ म्हणजे नंतर टिंगल-टवाळीला एक विषय मिळेल असे ठरवले व आम्ही परत श्री. एकबोट्यांकडे वळलो.

गंमतीची गोष्ट म्हनजे या मधल्या काळात श्री. एकबोटे कोठेतरी गायबच झाले होते.  आम्ही  आजूबाजूला त्यांचा शोध घेण्याचा जरा प्रयत्न केला पण ते कोठे दिसलेच नाहीत. त्यांना अवचितपणे काही निरोप आला असल्याने ते असे अकस्मात गेले असावेत असे ठरवून आता एवढे ठरवलेच आहे तर शाळा बघून घेऊ असे ठरवून आम्ही शाळेकडे वळलो. मुख्य रस्त्याला जोडणार्‍या शेवटच्या गल्लीत वळून थोडे पुढे आल्यावर शाळेची उंच भिंत व त्या भिंतीच्या आतून डोकावणारा क्लॉक टॉवर हा इतका सहजपणे दिसत होता की एकबोट्यांचे वर्णन किती सार्थ होते याची प्रचिती लगेचच आम्हाला आली.  शाळेच्या प्रांगणात आम्ही प्रवेश केला तेंव्हा समोरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष गेले. घड्याळ दुपारचे 12 वाजल्याचे दर्शवत होते.

शाळेची मुख्य दगडी इमारत तशी जुनी, म्हणजे ब्रिटिशांच्या कालातील दिसत होती. इमारतीच्या शेजारीच चौरस आकाराचा क्लॉक टॉवर होता. टॉवरच्या प्रत्येक बाजूला लांबुडक्या आणि अरूंद अशा तीन खिडक्या बसवलेल्या होत्या. खिडक्यांना वरच्या बाजूला कमानीदार आकार दिलेला होता आणि डिझाइन केलेली रंगीबेरंगी काचांची पॅनेल्स आत बसवलेली होती. वर असलेल्या घड्याळात रोमन आकडे असल्याने तेही जुनेच असावे हे स्पष्ट होते. इमारतीवर कौलारू छप्पर होते व एकूण पहाता ही शाळेची इमारत न वाटता हे एखादे चर्च असावे असे वाटत होते.

इमारतीच्या पायर्‍या चढून आत गेल्यावर समोर श्री. एकबोटे, मुख्याध्यापक अशी लाकडी पाटी लटकवलेली मी पाहिली पण ऑफिसमध्ये कोणीच दिसत नव्हते. जेवणाची सुट्टी झाली असावी असे समजत आम्ही क्लॉक टॉवरच्या पलीकडच्या बाजूस आम्ही मोर्चा वळवला. पलीकडच्या बाजूस कौलारू छप्पर असलेली शाळेची बैठी इमारत दिसत होती. शाळा बहुधा चौरस आकाराची असावी असे दिसत होते. आमच्या समोर असलेला एका बाजूच्या भिंतीचा भाग व त्याच्या काटकोनात असलेली दुसर्‍या बाजूची भिंत यामध्ये आत जाण्यासाठी प्रवेश मार्ग असावा असे दिसल्याने तेथून आम्ही आत प्रवेश केला. शाळेची इमारत चौरस असल्याचा आमचा अंदाज खरा असल्याचे समोर दिसत होते. मध्यभागी एक पटांगण, त्याच्या मध्यभागी ध्वजस्तंभ व पटांगणाच्या चारी बाजूंना मोठे व्हरांडे व त्याच्या मागे शाळेचे वर्ग अशी व्यवस्था होती. चौरस आकाराचे लाकडी खांब, दगडी जोत्यावर, वर्‍हांड्यांच्या कडांना उभारून वरच्या कौलारू छताला आधार दिलेला होता.

या वर्‍हांड्यामधूनच फेरफटका घेण्यास आम्ही मग सुरूवात केली. वर्गात डोकावून बघितल्यावर मन प्रसन्न होईल असेच दृष्य आत दिसत होते.  नीटनेटके गणवेश घातलेली मुले व मुली बाकावर बसून मोठ्या एकाग्रतेने शिक्षकांकडे बघत होती. एका वर्गात भारताचा नकाशा टांगलेला होता तर एका वर्गात पृथ्वीचा गोल दिसला. एका वर्गात शिक्षक काहीतरी शास्त्रीय प्रयोग करून दाखवत असल्याचे दिसत होते. शाळा नावाजलेली असल्याचे श्री एकबोटे यांचे म्हणणे अगदी सार्थ वाटत होते.

तिसर्‍या बाजूच्या वर्‍हांड्यातून जाताना माझ्या मनात प्रथम शंकेची पाल चुकचुकली. एवढी मुले येथे शिकत आहेत पण सगळीकडे इतकी भयाण शांतता का जाणवते आहे? मी माझ्या एका भावाला माझ्या मनातला सल बोलून दाखवला. मग तोही म्हणाला की तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? आपण एवढ्या वर्गांजवळून फिरतो आहोत पण एकाही वर्गातल्या कोणाही मुला-मुलीने बाहेर कोण आहे म्हणून वळून पाहिलेले नाही. मग सगळ्यांशी मी बोललो. सर्वांनाच येथे काहीतरी विचित्र घडते आहे हे जाणवत होते. मगा आम्ही तेथून बाहेर पाय काढायचा ठरवला. जरा भरभरच पावले उचलत आम्ही चौथ्या बाजूचा वर्‍हांडा पार केला पण तो वर्‍हांडा आणि आम्ही आधी बघितलेला पहिल्या बाजूचा वर्‍हांडा यामधे इतका वेळ दिसत असलेला प्रवेशमार्ग आता लुप्तच झाला होता. मग आम्ही आपली बाजू चुकली असेल म्हणून परत एकदा चक्कर मारली पण शाळेतून बाहेर जायला मार्गच नव्हता. आता मात्रआम्ही जाम टरकलो होतो. आम्ही पळायला सुरूवात केली. नखशिखांत घामेजून आमच्या अंगातून घाम गळू लागला. वेड्यासारखे मग आम्ही जोराने पळू लागलो. आमचे पाय धुळीने माखताहेत, पायावर, घोट्यांवर, काट्यांमधून चालल्यासारखे ओरखडे उठताहेत, कपडे मळले आहेत, कोठेच आमचे लक्ष नव्हते. शेवटी दमून थकून पटांगणाच्या मध्यभागी असलेल्या ध्वजस्तंभाजवळ आम्ही घट्ट कोंडाळे करून बसलो. एकमेकाशी बोलण्याचे कोणालाही त्राण नव्हते. घसे पार सुकून गेले होते. पण आमच्या चारी बाजूंना शाळा मात्र चालूच होती. इतिहास, भूगोल, शास्त्र, गणित, सर्व विषयांचे अध्ययन चालूच होते. मुले एकाग्रगतेने, शिक्षक काय सांगतील ते ऐकत होती.

खूप वेळ गेलेला असावा कारण वेळाचे काही भानच उरले नव्हते. अचानक पेट्रोमॅक्सचा प्रखर उजेड आमच्या तोंडावर पडला. अरे हे सगळे इथे आहेत. कोणीतरी मोठ्या आवाजात म्हणाले. अरे तुम्ही या बाभ

Share the post

शाळा

×

Subscribe to अक्षरधूळ | माझे मराठी लेखन

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×