Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

फलटणच्या रणरागिणी...


8 मार्च 2012 महिला दिनानिमित्त.....
फलटण हे ऐतिहासिक स्थळ आहेच आणि फलटणकरांना याचा अभिमान आहे. त्याचप्रमाणे फलटण हि जन्मभूमी आणि कर्मभूमी मानणार्‍या महिलांची कामगिरी इतिहासात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारी आहे. फलटण हे काही महिलांचे माहेर असेल तर काहींचे सासर. फलटणच्या कन्या असोत वा फलटण स्नूषा असतील. अशा महिलांनी विविध क्षेत्रात आपली स्वतंत्र कामगिरी बजावली आहे. जिजाऊ, खुद्द फलटणच्या श्रीमंत छत्रपती सईबईराजे यांनी आरक्षण नसतानाही आपल्या कर्तबगारीचा झेंडा फडकविला. यांचाच आदर्श घेवून माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी कतृत्वाचा ठसा भारतात नव्हे तर जगात उमटविला. पण, आजच्या घडीला समान हक्क, सत्तेत, राजकारणात समान वाटा मिळून सुद्धा निर्णय प्रक्रियेत पुरुषांचा सहभाग जिथे तिथे असल्याचे चित्र दिसून येेते. हे दुर्दैवी आहे. फलटणमधील महिलांनी आपल्या कतृत्वाचा व कर्तबगारीचा ठसा उमटविला आहे. इतिहासातील व सध्या समाजाला आदर्शवत असणार्‍या फलटणमधील महिलांची यशोगाथा खास फलटणकरांसाठी....

श्रीमंत छत्रपती सईबईराजे भोसले: 
महाराष्ट्राचे आराध्यदैवत व स्वराज्याचे शिल्पकार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती सईबईराजे भोसले या होत्या.

श्रीमंत सगुणामाता (आईसाहेब) नाईक निंबाळकर:
श्रीमंत सगुणामात (आईसाहेब) या प्रभु श्रीरामाच्या भक्त होत्या. फलटणचे आराध्य दैवत असणार्‍या व मध्यवर्ती असलेल्या श्रीराम मंदिराची निर्मिती अथक प्रयत्नातूनच झाली.

श्रीमंत लक्ष्मीदेवी (राणीसाहेब) नाईक निंबाळकर:
फलटण हे संस्थान असल्याने येेथे दरबाराचे आयोजन केले जात असे. या दरबारामध्ये महिलांना पडद्याच्या पाठीमागे राहून कामकाजात सहभाग घ्यावा लागत असे. श्रीमंत राणीसाहेब उर्फ लक्ष्मीदेवी यांनी हि प्रथा मोडून काढली.

श्रीमंत सरोजीनीराजे उर्फ अक्कासाहेब नाईक निंबाळकर:
फलटणच्या राजकन्या या फलटणमधील पहिल्या महिला वैमानिक आहेत. यांच्यासाठीच श्रीमंत मालोजीराजे यांनी फलटणमधील विमानतळाची उभारणी केली होती.

मॅक्सिन बर्नस्टन:
परदेशातून फलटणसारख्या ग्रामीण भागात येवून येथील उपेक्षितांना शिक्षण देण्याचे अखंडीत कार्य करीत आहेत.

बेबीताई कांबळे:
फलटणच्या बेबीताई कांबळे या लेखिका असून यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

जाई निमकर:
फलटणच्या कन्या जाई निमकर या इंग्रजी लेखिका आहेत. यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर: 
फलटणच्या राजकारणात आपला ठसा उमटविला आहे. त्याचबरोबर गोविंद मिल्कची उभारणी केली आहे. फलटणकरांसाठी उत्कृष्ठ राजकारणी व उद्योजिका म्हणून नावलौकीक आहे.

जिजामाला नाईक निंबाळकर: 
फलटणच्या राजकारणात नुकतेच पदार्पण केले आहे. याआधी त्यांनी स्वराज इंडिया प्रायव्हेट लि. या उद्योगाची धुरा सांभाळत आहेत.

मधुबाला भोसले: 
स्वयंसिद्धा नामक ग्रुपच्या सहाय्याने समाजकार्यासाठी व महिलांसाठी कार्य सुरु आहे. त्याचबरोबर फलटणच्या नगरसेविका आहेत.

यांच्यासारख्या अनेक कर्तबगार महिलांचा नामोल्लेख याठिकाणी करता येईल....


This post first appeared on फलटण (Phaltan), please read the originial post: here

Share the post

फलटणच्या रणरागिणी...

×

Subscribe to फलटण (phaltan)

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×