Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Marathi Poems

Marathi Poems


ऊठ रे काळ्या पेंगू नको आता,
राहू केतूचे सैनिक नाहीतर धरतील तुमच्याच माना ॥
चाल-चाल चालायचंय , राब-राब राबायचंय,
क्षितिजाच्या सामोरी जाऊन सूर्योदयही पहायचंय,
ओसाड झाल्या जमिनीवर हिरवं छप्पर घालायचंय,
मंतरलेल्या नदीतून देव देणं आणायचंय ॥
ऊठ ऊठ काळ्या पेंगू नको आता,
काळे गोरे सगळेच नाही तर मारतील तुला लाता ॥
हजार खोलीच्या मालकाला अ, ब, क, ड शिकवायचंय,
जमलंच तर हात पकडून जग खरं दाखवायचंय,
पाळण्यातल्या बाळाला अजून चालणं शिकवायचंय,
चालून पळून थकलेल्याला हात देऊन उठवायचंय ॥
सांभाळ रे काळ्या पेंगू नको आता,
डोक्यावरचा भार खाली पडेल मेल्या ॥
गीता, कुराण, बायबल पुन्हा एकदा वाचायचंय,
काना, मात्रा, वेलांटीला जग सारं सांगायचंय,
उघड्याबंब पेटाऱ्याना छपराखाली ठेवायचंय,
गडद-फिकट देखाव्यांचे सूर भारी जुळवायाचेय ॥
चल पटकन काळ्या पेंगू नको आता,
वेळ सरतोय आता घाई कर पोरा ॥
अजस्त्र बाहूंनी जग सारं ओढायचंय,
न खरचटता दरी न डोंगर ओलांडायाचेय,
नारायणाच्या दर्शनाला टपटप जायचंय,
पुढच्या माईलस्टोनला पटकन गाठायचंय ॥


This post first appeared on MrMarathi.in, please read the originial post: here

Share the post

Marathi Poems

×

Subscribe to Mrmarathi.in

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×